Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हा काय मूर्खपणा आहे?” NEET पेपरफुटी रोखण्यासाठी वायुसेनेची मदत; केंद्राच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर संतप्त

केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे हे जाहीर केले. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्राच्या या निर्णयाचा विरोध करत 'हि कसली मूर्खता आहे?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 29, 2026 | 06:53 PM
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Follow Us
Follow Us:

NEET पेपरफुटीमुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अश्यातच आता केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे हे जाहीर केले. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्राच्या या निर्णयाचा विरोध करत ‘हि कसली मूर्खता आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नीट परीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य संधिया यांच्यासह सीबीएसई (CBSE) आणि एनटीएचे (NTA) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नीट पेपरफुटी टाळण्यासाठी वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावरून आता प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला चांगलेच फैलावर घेतले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून या निर्णयाचा विरोध केला. ते यावेळी म्हणाले, “हा काय मूर्खपणा आहे? खरंच, हा काय मूर्खपणा आहे? जर नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वाहून नेण्यासाठी हवाई दलाची गरज लागत असेल, तर हे भक्कम सुरक्षेचे लक्षण नसून, एका पूर्णपणे अयशस्वी परीक्षा प्रणालीचा जिवंत पुरावा आहे. नीट पेपरफुटी या प्रश्नपत्रिका वाहून नेणारे ट्रक सुरक्षित नसल्यामुळे होत नाहीत. त्या होत आहेत कारण भ्रष्टाचार व्यवस्थेत खोलवर रुजलेला आहे, यात अंतर्गत सूत्रधारांचा सहभाग आहे आणि प्रशासन व व्यवस्थेमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव आहे.”

ये कैसी मूर्खता है!? सच में, ये क्या मूर्खता है? अगर NEET परीक्षा के प्रश्नपत्रों को ले जाने के लिए वायुसेना की ज़रूरत पड़ रही है, तो यह मजबूत सुरक्षा का संकेत नहीं है, बल्कि एक पूरी तरह नाकाम परीक्षा व्यवस्था का जीता-जागता सबूत है। NEET पेपर लीक इसलिए नहीं हो रहे क्योंकि पेपर… https://t.co/KQht5c4gHD — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 29, 2026

पुढे ते म्हणाले, “नीट परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी हवाई दलाचा वापर करणे, हा मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला एक नाट्यमय डाव आहे. मी कल्पना करू शकतो की हा मूर्खपणा भाजप कार्यकर्ते आणि काही पत्रकारांना किती जास्त आवडेल. भारतीय हवाई दल देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आहे, भाजपची अकार्यक्षमता आणि शिक्षण मंत्रालयातील घोर भ्रष्टाचाराची भरपाई करण्यासाठी नाही! धर्मेंद्र प्रधान यांना लाज वाटायला हवी. २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअर उद्ध्वस्त करून राजीनामा देण्याऐवजी, ते लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यावरून विचलित करण्यासाठी अशा मूर्खपणात गुंतले आहेत! अत्यंत लाजिरवाणे!” अश्या शब्दांत त्यांनी भाजपवर आगपाखड केली.

“प्रिय देवेंद्रजी, पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन,” संजय राऊत यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

२१ जून रोजी पुन्हा होणार परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) १२ मे रोजी निर्णय घेतला होता की, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेसासाठी ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पेपर लीकच्या आरोपांमुळए रद्द करण्यात आली आहे. आता ही पुन्हा परीक्षा २१ जून रोजी आयोजित केली जाणार आहे.

साताऱ्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा सरकारविरोधी एल्गार, बैलगाडीतून आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Web Title: Prakash ambedkar slams central government over air force security to avoid neet paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • neet paper leak
  • Prakash Ambedkar
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल
1

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल

Delhi high Court on CJP: केंद्र सरकारला मोठा धक्का! ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X खाते पूर्ववत करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
2

Delhi high Court on CJP: केंद्र सरकारला मोठा धक्का! ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X खाते पूर्ववत करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.