
Prakash Ambedkar's reaction to Maghi Ganeshotsav POP idol immersion controversy
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची भेट घेतली आहे. या राजकीय भेटीवरुन जोरदार राजकारण रंगले आहे. या भेटीनंतर राज्यामद्ये नवीन समीकरण बघायला मिळणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे नेते आहेत, ते जिल्ह्याचे आहेत, सामाजिक व इतर गोष्टींसाठी भेट घेण्यासाठी आलो. वेगवेगळ्या अर्थाने चर्चा झाली. सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही, तर अधिवेशनात आवाज उठवणार” असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. “शरद पवार मोठे नेते आहेत. पुरस्कार कोणी द्यायचा, कोणी घ्यायचा हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांना अजून शरद पवार समजले नाहीत” असं संजय राऊत यांच्याबद्दल मिटकरी म्हणाले. “ठाकरे कुटुंब फोडण्याला संजय राऊत हे कारणीभूत आहेत. एकनाथ शिंदे फुटण्याला, आग लावणारे तुम्हीच आहात, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी घणाघात केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर अमोल मिटकरी यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “अमोल मिटकरी अकोला जिल्ह्याचे आहेत. ते नेहमीच भेटतात. जिल्ह्याचे काही प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांच्या मार्फत भेटतो” असं प्रकाश आंबडेकर या भेटीवर म्हणाले. “ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश योग्य आहेत. माझा एक विनंती ईव्हीएम चेक करावं. ज्या ईव्हीएम मतदार संघात होत्या, पण वापरल्या गेल्या नाहीत, अशा ईव्हीएम कोर्टाने त्यांच्या आवारात बोलवाव्यात आणि मतदान करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का ते बघावे. त्या त्या उमेदवाराला 130 मतदान मिळत का ते तपासून घ्यावं. मग लक्षात येईल की ईव्हीएमची चीप मन्युप्युलेट होते की नाही” असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी माघी गणेशोत्सवामध्ये पीओपी मूर्ती विसर्जन करण्यावरुन झालेल्या राजकारणावर देखील भाष्य केले. याबाबत मत मांडताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मत मांडले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसंख्या वाढत आहे, गणपतीची संख्या पण वाढत आहे. पैशांचा सुळसुळाट आहे. एका रस्त्यावर दहा गणपती दिसतात, हा आता श्रद्धेचा भाग नाही, तर खेळाचा भाग झाला आहे. योग्य पॉलिसी करणे गरजेचे आहे. राजकारणासाठी मंडळ काढायचं आणि तेथे उपासनेपेक्षा हेटाळणी होते, असं मला वाटतं” असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे.