Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसने ‘शाह’ यांना दिला ‘शह’! तालुका प्रभारी अध्यक्षपदी प्रकाश साळवी तर शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती

काँग्रेसने चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्षपदी खेर्डी येथील प्रकाश साळवी यांची तर चिपळूण शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती केली आहे. ही निवड वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी जाहीर केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 25, 2025 | 04:25 PM
काँग्रेसने 'शाह' यांना दिला 'शह'! तालुका प्रभारी अध्यक्षपदी प्रकाश साळवी तर शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती

काँग्रेसने 'शाह' यांना दिला 'शह'! तालुका प्रभारी अध्यक्षपदी प्रकाश साळवी तर शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेसने ‘शाह’ यांना ‘शह’ दिला
  • प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती
  • शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला
चिपळूण: चिपळूण नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राजकीय नाट्यमय घडामोडी नंतर काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. यानंतर काँग्रेसने चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्षपदी खेर्डी येथील प्रकाश साळवी यांची तर चिपळूण शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती केली आहे. ही निवड वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी जाहीर केली आहे. याची माहिती उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांना देण्यात दिली आहे. या निवडी पाहता काँग्रेसने ‘शाह’ यांना ‘शह’ दिला आहे.

काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेले लियाकत शाह यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने शिवसेना शिंदे गटातून काँग्रेसमध्ये आलेले सुधीर शिंदे यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची लॉटरी लागली आणि नाराज झालेले शाह यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले . यानंतर काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी रविवारी सायंकाळी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत या नाट्यमय घडामोडी संदर्भात चर्चा झाली. यानंतर सोमवारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी शाह यांचा राजीनामा मंजूर करीत काँग्रेसच्या चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्षपदी खेर्डी येथील प्रकाश साळवी यांची नियुक्ती जाहीर केली.

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप

खेर्डी येथील प्रकाश साळवी यांनी खेर्डी ग्रामपंचायतच्या सदस्य पदासह उपसरपंच पदाची जबाबदारी भूषवत खेर्डी गावच्या विकासात योगदान दिले आहे. तितकेच सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदाची देखील यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत काँग्रेस वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आता तर काँग्रेसने चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून साळवी यांच्यावर विश्वास दाखवला आहे .

याबाबत ते म्हणाले की, काँग्रेसने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू तसेच चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसह उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.

तसेच काँग्रेसच्या चिपळूण शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती करून निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याला काँग्रेसने सन्मान दिला आहे. या दोन्ही निवडी बाबत समाधान व्यक्त केले जात असून दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

म्हणूनच शाह यांच्यावर कारवाई!

काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर शिंदे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे असताना माजी तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे राहणे चुकीचे आहे. यामुळे पक्षाकडून कारवाई होणे गरजेचे होते. ते झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दिली आहे.

Maharashtra political : शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Web Title: Prakash salvi appointed as congress taluka in charge president of chiplun while kaiser desai appointed as city in charge president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Political

संबंधित बातम्या

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप
1

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप

Maharashtra political : शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
2

Maharashtra political : शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत 15 दिवसांनी वाढवा; काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र
3

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत 15 दिवसांनी वाढवा; काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

Eknath Shinde : “खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
4

Eknath Shinde : “खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.