शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हापरिषद गटात उबाठाला राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. गत कित्येक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या असुर्डे बनेवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात सोमवारी जाहीर प्रवेश केला असून उबठाला हा जोरदार धक्का मानला जात आहे. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रवेश घडल्याने राष्ट्रवादीला मजबूत बळ प्राप्त झाले असून उबठामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाला जोरदार दणका महायुतीच्या इतर पक्षांनी दिल्या नंतर सावध झालेल्या राष्ट्रवादीने तालुक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीला महत्व दिले आहे. याचीच सुरवात कोकरे जिल्हापरिषद गटातून राष्ट्रवादीने केली असून यामध्ये दमदार यश मिळवले आहे असुर्डे बनेवाडी येथील शेकडो ग्रामस्थ गत अनेक वर्ष उबाठा सोबत होते. दोनशे ते अडीचशे एक गठ्ठा असणारी ही मते राष्ट्रवादीला मिळत नव्हती. राजकीय गणितात ही मते अत्यन्त महत्वाची मानली जात होती. मात्र, आ. शेखर निकम यांचे काम आणि आजूबाच्या गावात वाड्यावर आ. निकम यांनी केलेली विकास कामे बघून येथील उबाठाच्या शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेत आज प्रवेश केला.
चंद्रकांत उर्फ बाबल्या बने यांच्यासह ग्रा.प. सदस्य अक्षता बने, प्रिया बने यांच्यासह महेंद्र बने, शांताराम बने,श्रीपत बने,शशिकांत बने, सुशील बने,सुनील बने,समीर बने,महेंद्र शी बने,धोंडू बने आत्माराम बने, रेश्मा बने,सचिन बने यशवंत बने सुवर्ण बने धनश्री बने,संगीता बने, जयश्री बने,पार्वती बने,गीता सोलकर,तुकाराम बने आदींसह शेकडो ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादी मध्ये आ शेखर निकम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
आ शेखर निकम यांनी बनेवाडी उबाठा शिवसैनिकांचे सोमवारी जोरदार स्वागत करीत सांगितले की, तुम्ही या पूर्वीच माझ्यासोबत हवे होतात. मात्र ठीक आहे आलात हे महत्वाचे आहे. तुमच्या सुखदुःखासह विकास कामात मी तुमच्या सोबत कायम असेल मला तुम्ही या पूर्वी ही जवळचे वाटत होतात आणि आता तर माझ्या कुटूंबातील तुम्ही झाला आहात असे स्पष्ठ केले.
यावेळी शेखर निकम यांनी सांगितले की, वाडीच्या विकासासाठी गावच्या विकासासाठी तुम्हाला लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देईल असा शब्द निकम यांनी देताच उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करीत जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हा नियोजन सदस्य विजय गुजर, निलेश खापरे, सुधीर राजेशिर्के, नागेश साळवी, असुर्डे सरपंच पंकज साळवी, श्रेयस सवर्डेकर, सुशील गुजर, संदेश खापरे, महेंद्र खापरे, सुधीर सावर्डेकर, जमीर मुल्ला, अंजिक्य आंब्रे , कोकरे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.






