Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Protest: लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार! पृथ्वीराज चव्हाणांकडून राज्यभर जनआंदोलनाची घोषणा

Congress Protest: सातारा हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून त्याचे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने मोठे केलेले अनेक नेते भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसने आम्हाला काय दिले, असा प्रश्न उपस्थित करतात. अशा नेत्यांबाबत योग्य निर्णय जनता घेईल, असेही ते म्हणाले.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 26, 2026 | 06:55 PM
Prithviraj Chavan, Satara Politics, Congress Agitation

Prithviraj Chavan, Satara Politics, Congress Agitation

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या अधिकृत पदग्रहण सोहळ्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची नवी फळी सक्रिय करणे.
  • शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि इंधन दरवाढीचे थेट चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला एकत्र करून स्थानिक पातळीवर सरकारविरोधी वातावरण तयार करणे.
  • ‘लोकशाही वाचवा’ या मुख्य नाऱ्याखाली राज्यभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आणि तालुक्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना थेट रस्त्यावर उतरवून मोठे जनआंदोलन उभे करणे.
Satara Politics: देशातील लोकशाही धोक्यात आली असून ती वाचवण्याची जबाबदारी आता काँग्रेसवर आली आहे. केंद्र व राज्य सरकारने लोकशाहीचा लिलाव काढल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, माहिती अधिकार कायद्यातील बदल, शेतकरी प्रश्न आणि आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका करत काँग्रेस राज्यभर जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

सातारा जिल्हा काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. देशातील लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्याचे काम सध्याचे सरकार करत असून, लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार असल्याचे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि जनतेवरील आर्थिक भाराविरोधात काँग्रेस व्यापक आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इथेनॉल धोरणावर भाष्य करताना त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबीयांचे इथेनॉल प्रकल्प असल्याचा उल्लेख केला. देशात इथेनॉलचा वापर १५ ते २० टक्क्यांपर्यंतच योग्य असून, एखाद्या विशिष्ट कुटुंबाला लाभ होईल अशा घाईगडबडीच्या निर्णयांना सरकारने प्रोत्साहन देऊ नये, अशी टीका त्यांनी केली.

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण

शेतकरी प्रश्नावर बोलताना चव्हाण म्हणाले की, बाजारभाव हमीभावापेक्षा कमी नसतील तर हमीभाव देण्याची गरज नाही, मात्र सरकारची सध्याची कर्जमाफी योजना फसवी असून त्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही.

माहिती अधिकार कायद्यात करण्यात येणाऱ्या बदलांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकारासारखा महत्त्वाचा कायदा आणण्यात आला होता. मात्र सध्याच्या सरकारला हा पारदर्शक कायदा नको असून, त्यांच्या कारभारातील अनेक गोष्टी जनतेसमोर येतील, या भीतीपोटी कायद्यात बदल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सार्वजनिक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत त्यांनी रस्ते बांधकामांमध्ये ४० टक्के कमिशन घेतले जात असल्याचे सांगितले. अयोध्येतील सोन्याच्या कथित चोरीचा मुद्दा, शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रभावी चौकशी होत नसल्याने हे सरकारचे मोठे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले. आरक्षणाच्या विषयावर बोलताना त्यांनी आरक्षणाचा उद्देश समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणे हा असल्याचे सांगितले. मात्र अपेक्षित न्याय मिळत नसेल तर त्यामागील कारणांचा गांभीर्याने शोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

CJP Protest: फक्त अंगठ्याचा ठसा द्या…! CJP अध्यक्ष अभिजीत दीपकेंकडून धर्मेंद्र प्रधानांना वाढदिवसाची ‘खास’ भेट

सातारा हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून त्याचे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने मोठे केलेले अनेक नेते भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसने आम्हाला काय दिले, असा प्रश्न उपस्थित करतात. अशा नेत्यांबाबत योग्य निर्णय जनता घेईल, असेही ते म्हणाले.

युवकांनी केवळ पक्षीय राजकारणात न अडकता आंदोलनातून समाजाशी जोडले गेले पाहिजे. युवक सर्वच स्तरावर सक्रिय असून त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आवाहन त्यांनी केले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत लोकशाहीचा गळा घोटण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आज माझा पदग्रहण सोहळा पार पडला. आमच्याकडे सहकारी साखर कारखाने नसले तरी काँग्रेसचे विचार आणि कार्यकर्त्यांचे मोठे बळ आहे. येत्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार आणि कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचा आमचा संकल्प आहे.”

 

Web Title: Prithviraj chavan speech satara congress democracy in danger agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Congress Politics
  • pruthviraj chavhan
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Satara News: सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा! ७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुशांत मोरेंचे गंभीर आरोप
1

Satara News: सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा! ७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुशांत मोरेंचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.