जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, '...असे कृत्य राक्षसच करू शकतो'
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘भीमाशंकर २० किलोमीटरवर आहे. अनेक वनौषधी आहेत. विष उतरवणाऱ्या वनौषधीही आहेत. गुजरातच्या टोरंट कंपनीला जंगल ताब्यात दिले आहे. मेहता, शहा यांना जंगले द्यायला सुरुवात केली आहे. ग्रामस्थांना मारण्यासाठी पोलीस आणले आहेत. ही लढाई थांबणार नाही. बघूया, हा प्रकल्प कसा होतोय’. तसेच कुठे रोपटी लावणार आहेत ही? झाडे तोडत असताना पक्ष्यांची घरटी गेली. रात्रभर ती तडफडत होती. या सरकारला लाज वाटत नाही. त्यांनी पर्यावरण खाते बंद करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, झाडे तोडण्यामागे पैसे खातात हे. राज्यात यापूर्वीही उद्योग आले आहेत. एमआयडीसी वगैरे आम्ही आणल्या आहेत. काळा पैसा यांना इथे गुंतवायचा आहे. वकिली कोण करतंय यांची? उज्ज्वल निकम टोरंट कंपनीच्या बाजूने आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.
चंद्रपुरात पाच हजार झाडे तोडली जाणार
खासदारकीसाठी अब्रूची लक्तरे काढून घ्यावी लागतात, हे दिसत आहे. दहा झाडे तोडणे म्हणजे एक कसाब. झाडे तोडणारे कसाबचे बाप आहेत, हे निकम यांनी समजून घ्यावे. त्यांची बाजू घेणे म्हणजे कसाबची बाजू घेणे. अदाणींनी देशाच्या इभ्रतीची कत्तल केली आहेच. अदाणींसाठी व्याघ्र प्रकल्पावर कुऱ्हाड चालवणार आहे. चंद्रपुरात पाच हजार झाडे तोडली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
1. कर्जत येथे कोणता मुद्दा चर्चेत आहे?
कर्जत येथील जंगलातील झाडे तोडण्याचा मुद्दा चर्चेत आहे.
2. जंगलतोडीवर कोणत्या खासदाराने भाष्य केले?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जंगलतोडीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
3. संजय राऊत यांनी झाडांबाबत काय दावा केला?
कर्जतच्या जंगलातील सुमारे २०० वर्षे जुनी झाडे तोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.






