हर्षदा देशमुख अन् कौस्तुभ गावडेंच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणे बदलली; वाचा 'सविस्तर राजकीय विश्लेषण'
कौस्तुभ गावडे यांनी मतदारांशी साधलेला संपर्क, प्रचाराचे नियोजन आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे या विजयाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. शिक्षक मतदारांच्या प्रश्नांवर भूमिका मांडताना उमेदवाराने केलेले प्रयत्न आणि संघटनात्मक पातळीवरील कामगिरी यांचे महत्त्व या निकालातून अधोरेखित झाले आहे. पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळविल्याने महाविकास आघाडीच्या गोटात समाधानाचे वातावरण आहे. मतमोजणीदरम्यान त्यांची आघाडी चर्चेचा विषय ठरली होती.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; फक्त दोन जागांवर विजय तर नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली
पसंतीक्रमाच्या मतांमुळे मतमोजणीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनली होती. अखेरच्या टप्प्यापर्यंत निकालाबाबत उत्सुकता कायम राहिल्याने या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. देशमुख- जाधव यांच्या विजयामुळे पदवीधर मतदारांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याची संधी महाविकास आघाडीला मिळाली आहे. मात्र, या यशाचे श्रेय केवळ पक्षीय समीकरणांना देण्याऐवजी उमेदवाराचा मतदारांशी असलेला संपर्क, स्थानिक नेतृत्वाची भूमिका आणि प्रचारातील मुद्दे यांचाही विचार करावा लागणार आहे.
दोन्ही मतदारसंघांतील निकालांकडे केवळ विजय आणि पराभव या मर्यादित चौकटीतून पाहता येणार नाही. शिक्षक मतदारसंघातील भाजपचे यश आणि पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीची बाजी, यांमधून मतदारांच्या अपेक्षा आणि स्थानिक राजकीय समीकरणांचे वेगवेगळे चित्र समोर आले आहे. एका मतदारसंघातील विजयाच्या आधारे संपूर्ण विभागात राजकीय वर्चस्व निर्माण झाल्याचा दावा करणे योग्य ठरणार नाही. या निकालामुळे दोन्ही आघाड्यांना आपल्या संघटनात्मक ताकदीचा आढावा घेण्याची संधी मिळाली आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील पराभवामुळे भाजपच्या उमेदवार निवडीपासून निवडणूक व्यवस्थापनापर्यंतच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शिक्षक मतदारसंघात विजय मिळविणाऱ्या भाजपला पदवीधरमध्ये मात्र अपयश आले. या निकालामागे उमेदवारीतील बदल, स्थानिक नेतृत्वातील प्रचारयंत्रणेतील त्रुटी कारणीभूत ठरल्या का, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
माजी आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच पक्षाने ऐनवेळी डॉ. स्मिता जाधव यांना संधी दिली. त्यामुळे उमेदवारीसाठी तयारी करणाऱ्या स्थानिक नेत्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले. या निर्णयानंतर कार्यकत्यांची यंत्रणा कितपत एकसंध राहिली आणि शरद लाड यांच्या संपर्काचा पक्षाला किती फायदा झाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
दुसरीकडे, पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले नियोजन, मतदारनोंदणीचा प्रत्यक्ष मतदानासाठी झालेला उपयोग आणि महायुतीतील घटकपक्षांचा सहभाग यांचीही चिकित्सा करावी लागणार आहे. शिक्षक मतदारसंघातील विजयामुळे पदवीधरमध्येही यश मिळेल, असे पक्षाचे गणित असेल, तर दोन्ही मतदारसंघांतील मतदारांची वेगळी मानसिकता आणि स्थानिक समीकरणे ओळखण्यात कुठे कमी पडले. हा प्रश्न उपस्थित होतो.
Ans: पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले, तर पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या (NCP शरदचंद्र पवार) हर्षदा देशमुख-जाधव विजयी झाल्या.
Ans: शिक्षकांशी थेट संपर्क, मजबूत संघटनात्मक मांडणी आणि जुनी पेन्शन व शाळांच्या अनुदानासारख्या कळीच्या मुद्द्यांवर मांडलेली स्पष्ट भूमिका गावडेंच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली.
Ans: या विजयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर, तरुण आणि सुशिक्षित मतदारांवर महाविकास आघाडीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.






