ऐन दिवाळीत आजारांपासून मिळेल सुटका! पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Drinking Water: अन्न, पाणी आणि वस्त्र या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील कोणतेही एक गोष्ट नसेल तरीसुद्धा माणूस व्यवस्थित जगू शकत नाही. शरीर कायमच फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी नियमित ३ ते ४ लिटर पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. पण आपल्या घरात येणारे पाणी खरंच स्वच्छ आणि सुरक्षित आहे का? असे अनेक प्रश्न तुम्हाला सुद्धा कायमच पडत असतील. पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये काही समस्या निर्माण झाल्यानंतर पाण्यामध्ये माती, घाण, गाळ आणि रोगजंतू मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने काही भागांतील नागरिकांना ७ दिवस पाणी गरम करून पिण्याचा सल्ला दिला आहे.(फोटो सौजन्य – istock)
जलाशयाची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा पाणी सोडताना पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पाण्याची गुणवत्ता खराब होते आणि पाण्यात प्रामुख्याने कचरा असतो. त्यामुळे खबदारीचे उपाय म्हणून पाणी उकळवून पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अस्वच्छ किंवा दूषित पाणी प्यायल्यामुळे जुलाब, उलट्या आणि टायफॉइडसारख्या आजारांचा धोका झपाट्याने वाढतो. त्यामुळे पाणी कायमच गरम करून प्यावे. चला तर जाणून घेऊया पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी काय करावे, याबद्दल सविस्तर माहिती.
दूषित किंवा पिण्याच्या पाण्यात गळा तसाच असल्यास पाणी गरम करून प्यावे. यामुळे पाण्यातील जिवाणू, विषाणू आणि परजीवी नष्ट होण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी टोपात घेऊन पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत गरम करून घ्या. त्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेले पाणी गाळून स्वच्छ भांड्यात झाकण मारून ठेवावे. पण पाणी उकळवल्यानंतर त्यातील जिवाणू किंवा हानिकारक घटक नष्ट होतातच असे नाही. त्यामुळे केवळ गरम पाण्यावर अवलंबून न राहता योग्य ती उपाययोजना करावी.
पाण्यामध्ये गाळ किंवा माती दिसत असल्यास थेट पाणी गरम करण्याऐवजी सगळ्यात आधी पाणी गाळून घ्या. त्यानंतर पाणी उकळवून पुन्हा एकदा कॉटनच्या पातळ कपड्यावर पाणी गळा. साध्या कापडातून गाळल्याने सर्व रोगजंतू नष्ट होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी पाणी उकळवून नंतरच गाळून घ्यावे. आरओ, यूव्ही किंवा अन्य प्रकारचा वॉटर प्युरिफायर असल्यास त्याची सुद्धा देखभाल करणे आवश्यक आहे. ३ ते ४ महिन्यातून एकदा घरातील पाणी शुद्ध करणाऱ्या वस्तूंची योग्य स्वच्छता करून घ्यावी. प्युरिफायर किंवा घरातील इतर उपकरणांवर अवलंबून न राहता योग्य ते काळजी घेणे फार आवश्यक आहे.
Ans: पाणी उकळणे, योग्य क्षमतेचे व नियमित देखभाल केलेले वॉटर प्युरिफायर वापरणे आणि आवश्यकतेनुसार अधिकृत पाणीशुद्धीकरण पद्धतींचा अवलंब करणे हे पाणी सुरक्षित करण्याचे प्रभावी उपाय आहेत.
Ans: पाणी उकळी आल्यावर किमान एक मिनिट उकळावे. उंच डोंगराळ भागात सुमारे २,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर तीन मिनिटे उकळण्याची शिफारस केली जाते. त्यानंतर पाणी स्वच्छ, झाकण असलेल्या भांड्यात साठवावे.
Ans: दूषित पाण्यामुळे अतिसार, कॉलरा, टायफॉइड, आमांश आणि इतर पाणीजन्य संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.






