Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OBC Bachao Morcha: मुंबईकडे जाणारा ‘ओबीसी बचाव मोर्चा’ पोलिसांनी रोखला; लक्ष्मण हाकेंचा ३ तास ठिय्या!

OBC Bachao Morcha: परवानगी नाकारल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी पुणे-सोलापूर महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 01, 2026 | 04:48 PM
OBC Bachao Morcha: मुंबईकडे जाणारा ‘ओबीसी बचाव मोर्चा’ पोलिसांनी रोखला; लक्ष्मण हाकेंचा ३ तास ठिय्या!
Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या दिशेने जाणारा ‘ओबीसी बचाव मोर्चा’ पाटस टोलनाक्यावर रोखला\
  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह शेकडो आंदोलकांचा महामार्गावर ३ तास ठिय्या
  • पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam)
 

OBC Bachao Morcha: दौंड तालुक्यातील पाटस येथून मुंबईकडे मंगळवारी (1 सप्टेंबर) सकाळी दहा वाजता निघालेला ओबीसी बचाव मोर्चा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्यावर पोलिसांनी रोखल्याने मोठा गोंधळ उडाला. यवत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे तब्बल तीन साडेतीन तास आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखून धरली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

राज्यातील ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी, बोगस आणि बनावट ओबीसी जातीचे दाखले रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार

आज सकाळी १० वाजता पाटस येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा सकाळी ११ वाजता पाटस टोलनाक्यावर येऊन धडकला. टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला असता, पोलीसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा रोखला.

यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक गिल यांनी मोर्चाला परवानगी नसल्याने पुढे जाता येणार नाही, असे आंदोलकांना सांगितले. मात्र, आंदोलकांनी पोलिसांचे म्हणणे फेटाळून लावत मुंबईकडे जाण्यावर ठाम भूमिका घेतली.

परवानगी नाकारल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी पुणे-सोलापूर महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

अष्टविनायक मार्गावर वाहतूक कोंडी

पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी दोन-तीन वेळा सविस्तर चर्चा केली, मात्र हाके आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि पाटस-दौंड-अष्टविनायक मार्गावर चारही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली. शेकडो वाहने अडकून पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

तीन ते साडेतीन तासानंतर पोलिस अधीक्षक गिल आणि लक्ष्मण हाके यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या मोर्चाला पुढे जाण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या आंदोलनामुळे पाटस आणि टोलनाका परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ओबीसींचा आवाज दाबता येणार नाही

आमचा मोर्चा शांततेत आहे. बोगस दाखले रद्द करा हीच आमची मागणी आहे. आम्हाला कितीही रोखले तरी ओबीसींचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचवणारच, असे लक्ष्मण हाके यांनी यावेळी ठणकावून सांगितले

 

Web Title: Pune newsobc bachao morcha stopped at patas toll naka pune solapur highway laxman hake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Daund News
  • Laxman hake
  • obc

संबंधित बातम्या

‘ओबीसी आरक्षण गाडण्याचा डाव’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर घणाघात, १ सप्टेंबरला मुंबईकडे मोर्चा
1

‘ओबीसी आरक्षण गाडण्याचा डाव’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर घणाघात, १ सप्टेंबरला मुंबईकडे मोर्चा

मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट? लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध
2

मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट? लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.