Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विधानपरिषद उमेदवारीवरून मोठा गोंधळ, विक्रम काकडेंना मिळाली उमेदवारी तर सुनील टिंगरेंची बंडखोरी

पुणे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांचे नाव पुढे येत असले तरीही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय सुनील टिंगरे बंडखोरी थेट फॉर्म भरायला पोहोचले असल्याचे वृत्त आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 01, 2026 | 03:35 PM
Pune Vidhanparishad Election Sunil Tingre rebels due to NCP gave candidature to Vikram Kakade,

Pune Vidhanparishad Election Sunil Tingre rebels due to NCP gave candidature to Vikram Kakade,

Follow Us
Follow Us:
  • पुणे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निवडीसाठी मोठा गोंधळ
  • पुणे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांचे नाव
  • सुनील टिंगरे बंडखोरी थेट फॉर्म भरायला पोहोचले असल्याचे वृत्त
विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज (सोमवार, १ जून) शेवटचा दिवस असून पुणे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निवडीसाठी मोठा गोंधळ उडाला असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांचे नाव पुढे येत असले तरीही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय सुनील टिंगरे बंडखोरी थेट फॉर्म भरायला पोहोचले असल्याचे वृत्त आहे.

महायुतीत झालेल्या जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पुणे या दोन जागा आल्या. यातली कोकणातील जागा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना देण्यात आली आहे. तर पुण्याच्या जागेवरून आता वाद उद्भवला आहे. पुण्यात पार्थ पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. काल रात्री राष्ट्रवादीच्या बैठकीत विक्रम काकडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघड नाराजी दर्शवली. आज पुन्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत जिजाई बंगल्यावर बैठक पार पडली. दोन तास चाललेल्या या बैठकीत विक्रम काकडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी संजय काकडे आणि विक्रम काकडे यांचा पक्षप्रवेशही पार पडला. मात्र त्याआधीच या जागेसाठी आग्रही असलेले सुनील टिंगरे बैठकीतून बाहेर पडले आणि थेट राष्ट्रवादी कार्यालय गाठून विधान परिषद उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली.

कोकणच्या जागेवरून नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे आधी म्हणाले ‘युतीधर्म पाळा’, आता दिल्या अर्ज मागे न घेण्याच्या सूचना

सुनील टिंगरे हे बैठकीतून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरले. त्यावेली त्यांनी प्रतिक्रिया देत, “मी पुढची तयारी करण्यासाठी पार्टी ऑफिसला चाललो आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार,” असे बोलून ते निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयात ते पोहोचले. विधान परिषदेचा फॉर्म भरायची सुरुवात त्यांनी त्यावेळी केली. तेव्हाच सुनील टिंगरे यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत उमेदवारीसाठी नाव निश्चित झालेले विउकरं काकडे हेसुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. तेसुद्धा फॉर्म भरायच्या लागले. यावेळी सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे हे दोघेही समोरासमोर बसून उमेदवारी अर्ज भरत होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील उमेदवारीबाबतचा सावळागोंधळ समोर आला आहे. आता राष्ट्रवादीकडून कोणाला एबी फॉर्म दिला जातो.हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Vidhan Parishad Election: ठाणे एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना शिवसेनेची उमेदवारी

Web Title: Pune vidhanparishad election sunil tingre rebels due to ncp gave candidature to vikram kakade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Latest pune news update
  • vidhanparishad election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.