Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Someshwar Sugar Factory Election 2026: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत! युगेंद्र पवारांकडून उमेदवारांची यादी जाहीर

Someshwar Sakhar Karkhana: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 'श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पॅनल 'या पॅनल ची घोषणा करून आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. स्वतः जय पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 01, 2026 | 04:01 PM
Someshwar Sakhar Karkhana

Someshwar Sakhar Karkhana

Follow Us
Follow Us:
  • युगेंद्र पवार व राजेंद्र जगताप यांच्याकडून ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ची अधिकृत घोषणा.
  • सतीश खोमणे, दत्ता चव्हाण, पोपट पानसरे या अनुभवी दिग्गजांचा पॅनलमध्ये समावेश.
  • अजित पवार गटाकडून जय पवार यांच्या उपस्थितीत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पॅनल’ जाहीर.
Someshwar Sugar Factory Election 2026: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युगेंद्र पवार पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून इतर पक्षांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या यादीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्ता चव्हाण, बारामती तालुका पंचायत समितीचे माजी सभापती पोपट पानसरे, राजेंद्रकुमार जगताप यांच्यासह इतर उमेदवारांचा समावेश आहे.

‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पॅनल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पॅनल ‘या पॅनल ची घोषणा करून आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. स्वतः जय पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचा झेंडा घाती घेऊन पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या साथीने स्वतंत्र पॅनल ची घोषणा केली. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार आहे.

Chakan Traffic: चाकणच्या वाहतूक कोंडीवर PMRDA ची मोठी कारवाई! संथ कामामुळे ठेकेदाराला ७५ लाखांचा दंड

पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेमुळे आता तिरंगी लढत

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या नाट्यमय घडामोडी घडल्याने, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला वेगळे वळण आले आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या शरद पवार व अजित पवार गटात संभाव्य होणारी लढत पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेमुळे आता तिरंगी लढत झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह तालुक्यातील जनतेच्या संपर्कात आहेत.

विविध गावांमध्ये सभासदांशी संपर्क अभियान

गेल्या काही दिवसांपूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रात सभासदांची व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार त्यांनी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये सभासदांशी संपर्क अभियान सुरू ठेवून उमेदवारांची चाचपणी केली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची निवड स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुलाखती घेऊन केली आहे. जय पवार हे देखील स्वतः सुरेंद्र पवार यांच्याबरोबर मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते. एकंदर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची तिरंगी होत असलेली लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्रकुमार जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

Pune MLC Election 2026: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ कसा असतो? ५ जिल्हे, इतिहास आणि २०२६ च्या निवडणुकीचे गणित!

या पॅनलचे गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे:

निंबुत-खंडाळा गट : दत्ताजीराव रामराव चव्हाण (निरा शिवतक्रार), शंभूराजे सूर्यकांत काकडे (निंबुत), सुभाषराव नामदेव कोळेकर (बावकलवाडी), डॉ. मैत्रेयी शशिकांत काकडे (निंबुत), सोमनाथ कृष्णा मदने (गडदरवाडी).
मुरूम-वाल्हा गट : राजेंद्रकुमार तुकाराम जगताप (वाणेवाडी), प्रवीण शिवाजीराव भोसले (वाणेवाडी), संदीप सदाशिव चव्हाण (मुरूम), सुरेखा बाबुराव गायकवाड (करंजेपूल).

होळ-मोरगाव गट : अनिलकुमार चंदूलाल शहा (वडगाव निंबाळकर), दत्तात्रय भिवा ढोले (मोरगाव), सुनीता शिवाजी कारंडे (होळ), हर्षद अशोक होळकर (सदोबाची वाडी).
कोऱ्हाळे-सुपा गट : सतीश नामदेव खोमणे (कोऱ्हाळे बुद्रुक), पोपट गणपतराव पानसरे (पानसरेवाडी), शिवराज ऊर्फ प्रवीण तानाजी पवार (थोपटेवाडी), गोविंद कृष्णा पवार (कोऱ्हाळे खुर्द).
मांडकी-जवळा-अर्जुन गट : संतोष एकनाथराव जगताप (सासवड), संदीप रामचंद्र देवकर (मावडी सुपे), अंकुश मुरलीधर जगताप (मांडकी).

 

 

Web Title: Punesomeshwar sugar factory election yugendra pawar announces panel candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Baramati Politics
  • NCP News
  • Someshwar Sugar Factory
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
1

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा
2

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.