Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi On UPI Charges: UPI वर गुपचूप शुल्क लादण्याची तयारी; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!

Rahul Gandhi On UPI Charges: अमेरिकन पेमेंट कंपन्यांनी भारताच्या ‘झिरो-MDR’ धोरणाला दीर्घकाळापासून विरोध केला आहे. त्यामुळे खर्चात आणखी भर पडत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी मोदी सरकारने नेमक्या त्याच दिशेने धोरणात्मक बदलाचा मार्ग मोकळा केल्याचा आरोप केला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 15, 2026 | 03:11 PM
Rahul Gandhi, UPI Transaction Charges, Zero MDR Policy,

Rahul Gandhi, UPI Transaction Charges, Zero MDR Policy,

Follow Us
Follow Us:
  • UPI वर गुपचूप शुल्क लागू करण्याचा मार्ग मोकळा केल्याचा राहुल गांधींचा आरोप
  • ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहारांवर शुल्क; ६५% डिजिटल व्यवहारांच्या मूल्याला फटका
  • अमेरिकन कंपन्यांच्या दबावाखाली ‘झिरो-MDR’ धोरण बदलल्याचा विरोधी पक्षनेत्यांचा दावा
Rahul Gandhi On UPI Charges: देशातील आघाडीचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वरून आता राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गुपचूपपणे UPI वर शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा केल्याचा आरोप केला आहे. ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी पेमेंटवर शुल्क आकारले जाऊ शकते आणि त्याचा भार अखेरीस ग्राहकांवरच पडणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत याकडे लक्ष वेधले आहे. ‘₹2,000 पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार एकूण व्यवहारांच्या केवळ 5% असले तरी, ते एकूण UPI व्यवहारांच्या मूल्याच्या अंदाजे 65% आहेत. सरकार म्हणते की ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पण व्यापाऱ्यांकडून आकारले जाणारे शुल्क कुठून येणार?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

अमेरिकन पेमेंट कंपन्यांनी भारताच्या ‘झिरो-MDR’ धोरणाला दीर्घकाळापासून विरोध केला आहे. त्यामुळे खर्चात आणखी भर पडत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी मोदी सरकारने नेमक्या त्याच दिशेने धोरणात्मक बदलाचा मार्ग मोकळा केल्याचा आरोप केला. अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

नेमकं प्रकरण काय आहे?

खरं तर, UPI ने भारतातील पेमेंट करण्याच्या पद्धतीतच क्रांती घडवली आहे. सध्याच्या प्रणालीनुसार ₹2,000 पर्यंतच्या UPI पेमेंटसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, परंतु नवीन प्रणाली ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी पेमेंटसाठी शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा करते. याबाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पण जर ग्राहकाकडून थेट शुल्क आकारले जात नसेल, तर हे शुल्क कोण भरणार? असा सर्वात मोठा प्रश्न हा आहे.

UPI प्रणालीमधील दोन प्रकारचे पेमेंट समजून घेणे महत्त्वाचे आहे. पहिला प्रकार म्हणजे व्यक्ती-ते-व्यक्ती पेमेंट. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला पैसे पाठवता. अशा पेमेंटसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दुसरा प्रकार म्हणजे व्यापारी पेमेंट. म्हणजेच, तुम्ही UPI वापरून एखाद्या दुकानाला, कंपनीला किंवा व्यावसायिकाला पैसे पाठवता. जर व्यवहाराचे मूल्य ₹2,000 पेक्षा जास्त असेल, तर शुल्क आकारले जाईल.

पण सर्वसामान्य ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असा सरकारने दावा केला आहे. पण राहुल गांधी यांनी याला विरोध केला आहे हे शुल्क व्यापाऱ्याला सोसावे लागेल, परंतु त्याचा भार अखेरीस किमतींच्या माध्यमातून ग्राहकांवरच टाकला जाईल. राहुल गांधी यांनी या संपूर्ण मुद्द्याला अमेरिकन कंपन्यांचा दबाव आणि भारताच्या मोफत UPI प्रणालीतील बदलांशी जोडून सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने परदेशी दबावाचे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.

Rohit Pawar News: आदित्य ठाकरेंना क्लीनचीटच मिळेल; सीबीआयच्या FRIनंतर रोहित पवारांचा घणाघात!

सरकार काय म्हणत आहे?

यावर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकारने म्हटले आहे की, सर्वसामान्य UPI वापरकर्त्याकडून व्यवहार शुल्क आकारण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. ₹2,000 पर्यंतचे UPI पेमेंट विनामूल्य असेल. वैयक्तिक पेमेंटदेखील विनामूल्यच राहतील. सरकारच्या मते, मोठ्या व्यापाऱ्यांच्या पेमेंटसाठी लागू करण्यात येणारी कोणतीही शुल्क रचना ही UPI वापरकर्त्यांवर थेट भार टाकण्याच्या उद्देशाने नसून, संपूर्ण डिजिटल पेमेंट प्रणालीला दीर्घकाळात मजबूत आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने आहे.

 

Web Title: Rahul gandhi allegations on pm modi government over upi transaction charges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • national news
  • Rahul Gandhi
  • UPI payment

संबंधित बातम्या

UPI Payment वर चार्ज लागणार? केंद्र सरकारने केलं स्पष्ट,2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटबाबत काय दिला निर्णय?
1

UPI Payment वर चार्ज लागणार? केंद्र सरकारने केलं स्पष्ट,2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटबाबत काय दिला निर्णय?

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ
2

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?
3

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?

USA Money Transfer UPI : काय सांगता? आता थेट खात्यात ट्रान्सफर होणार डॉलर; अमेरिकेत UPI ची एन्ट्री
4

USA Money Transfer UPI : काय सांगता? आता थेट खात्यात ट्रान्सफर होणार डॉलर; अमेरिकेत UPI ची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.