उरलेल्या समर्थकांकडून टाळ्या-थाळ्या वाजवून घ्या; राहुल गांधींची मोदी सरकारवर जहरी टिका
मोदी सरकारच्या धोरणामुळे उद्योगपती, छोटे व्यावसायिक, महागाईने त्रस्त गरीब व मध्यमवर्ग तसेच बेरोजगार तरुण निराश आहेत. टाळ्या वाजत नसल्याने पंतप्रधान नाराज झाले. मात्र, त्यांच्या धोरणांनी लोकांना टाळ्या वाजवण्यासारखे ठेवलेले नाही, त्यांनी उरलेल्या समर्थकांकडूनव टाळ्या थाळ्या वाजवून घ्याव्यात, असा टोला राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
रोजगारनिर्मिती करणारे छोटे व्यापारी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या जीएसटीमुळे अडचणीत आले, अस्र आरोप राहुल गांधी यांनी केला, सरकारच्या धोरणांमुळे मोठ्या कंपन्यामधील स्पचाँही कमकुवत झाल्याचे ते म्हणाले. एकाधिकारामुळे रोजगार निर्माण होत नाहीत.
अमेरिका, चीन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची त्रियक्षीय बैठक झाल्यानंतर डोनाल्ड ट्रंप, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांचा फोटो शेअर करत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले, ‘कॉग्रेस सत्तेत असती तर भारताचे पंतप्रधान या टेबलवर असते. तडजोड करणारा पंतप्रधान कधीही या टेबलवर बसू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत फिक्कीच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करताना उद्योगपतींना थेट सवाल केला आहे. २०१४ मध्ये कॉर्पोरेट कर दर ३० टक्के होता, तो सरकारने कमी करून २२ टक्के केला; तसेच १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाला आयकरमधून सूट दिली. असे असूनही, कंपन्यांनी पगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे का, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. सरकारकडून विविध लाभ मिळूनही उद्योगाच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्याचे त्यांनी नमूद केले. या दरम्यान त्यांनी, “मला माहित आहे की तुम्ही आता टाळ्या वाजवणार नाही,” अशी टिप्पणीही केली.
Ans: फिक्कीच्या (FICCI) कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करसवलती मिळूनही रोजगारनिर्मिती आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत उद्योगपतींना प्रश्न विचारला होता. या विधानावरून राहुल गांधी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत हा सरकारचाच कबुलीजबाब असल्याची टीका केली आहे.
Ans: नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या जीएसटीमुळे रोजगार देणारे छोटे व्यापारी आणि MSME क्षेत्र अडचणीत आले असून, मोजक्या उद्योगपतींच्या एकाधिकारशाहीमुळे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
Ans: सरकारच्या धोरणांमुळे उद्योगपती, मध्यमवर्ग आणि बेरोजगार तरुण निराश असल्याने लोकांकडे टाळ्या वाजवण्यासारखे काहीच उरलेले नाही; त्यामुळे पंतप्रधानांनी उरलेल्या समर्थकांकडूनच टाळ्या-थाळ्या वाजवून घ्याव्यात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.






