Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : “शिवसृष्टी” उभारणीच्या ऐतिहासिक वाटचालीस सुरुवात; सुनिल तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ भव्य पुतळ्यासह "शिवसृष्टी" या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम खासदार सुनिल तटकरे व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 20, 2025 | 06:14 PM
Raigad News : “शिवसृष्टी” उभारणीच्या ऐतिहासिक वाटचालीस सुरुवात; सुनिल तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न
Follow Us
Close
Follow Us:
  • “शिवसृष्टी” उभारणीच्या ऐतिहासिक वाटचालीस सुरुवात
  • खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते म्हसळा येथे भूमिपूजन सोहळा संपन्न
  • शिवसृष्टी योजनेसाठी महत्वपूर्ण पाऊल

 

म्हसळा :  रायगड दीपावलीच्या शुभमुहूर्तावर म्हसळा तालुक्यात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण घडला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ भव्य पुतळ्यासह “शिवसृष्टी” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम खासदार सुनिल तटकरे व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यात ढोलताशांच्या निनादात, शिवप्रेमींच्या घोषणांत आणि रथयात्रेच्या थाटात संपूर्ण शहर एकत्र आले होते.जात, धर्म,पंथ,पक्ष विसरून हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून छत्रपती शिवरायांप्रती आपली निष्ठा व प्रेम व्यक्त केलं.”शिवाजी महाराज हे जगाच्या पाठीवर एकमेव राजा” आहेत , ज्याने कोणत्याही धर्माच्या किंवा वंशाच्या आधारे नव्हे,तर बारा बलुतेदारांच्या आधारावर रयतेचे राज्य निर्माण केले.” त्यांनी पुढे सांगितले की,शिवाजी महाराजांची शिकवण ही सर्वधर्म समभाव आणि लोकशाही मूल्यांची खरी प्रेरणा आहे.शिवसृष्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची उजळणी होणार असून हे केंद्र भविष्यात एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसृष्टीचा पहिला टप्पा सुरू होत असताना या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 2.15 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.विशेष म्हणजे जुने तहसील कार्यालय उपलब्ध करून देत प्रशासनाने कमीत कमी वेळात ही प्रक्रिया यशस्वी केली.या जागेवर शिवाजी महाराजांचा आश्वरूढ भव्य पुतळा आणि त्यांच्या कार्याचा इतिहास अधोरेखित करणारी शिवसृष्टी उभारली जाणार आहे.कार्यक्रमात म्हसळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा आढावा देताना खासदार तटकरे यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली. जानसई नदी संवर्धन व हिंगुलडोह पर्यटन विकास 40 कोटींची पाणी पुरवठा योजना,ग्रामीण रुग्णालय, शाळा,सामाजिक सभागृहांची उभारणीसीसीटीव्ही प्रणाली,धावीरदेव मंदिर परिसरात नियमित शासकीय मानवंदना देण्यात येईल असं देखील आदिती तटकरे .यांनी सांगितलं. उपस्थित असलेले सुनील तटकरे म्हणाले की, लोकांसाठी काम करण्याची संधी ही आदितीच्या नशिबात आहे आणि गावकरी तिला साथ देणारच, असे प्रतिपादव त्यांनी केलं.

Shaniwarwada Namaj Pathan: शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही; शनिवार वाडा नमाज पठणावरून रुपाली ठोंबरें मेधा कुलकर्णींवर संतापल्या

सुनील तटके पुढे असंही म्हणाले की, संकटसमयी मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”त्यांनी म्हसळा तालुक्याच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.उपस्थित मान्यवरांची मांदियाळी या ऐतिहासिक सोहळ्यास जिल्हाधिकारी रायगड,मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,पोलीस निरीक्षक संदीप कहाले,नगराध्यक्षा फरहीन बशारत, समीर बनकर, महादेव पाटील,नाझीम हसवारे, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे,नंदू गोविलकर,नाझीम चोगले,बबन मनवे, संजय कर्णिक,तसेच हिंदू-मुस्लिम समाजाचे नेते, भाजप-शिवसेना पदाधिकारी,सर्व नगरसेवक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ऐतिहासिकतेला एक नवा आयाम दिला.शिवसृष्टीमुळे हजारो स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून हे केंद्र इतिहास,पर्यटन आणि प्रेरणा यांचा संगम ठरेल. “शिवशाहूफुलेआंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित विकास” हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.म्हसळा येथे साकारली जाणारी शिवसृष्टी ही केवळ एक स्मारक न राहता भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आणि संपूर्ण कोकणासाठी अभिमानाचा विषय ठरणार आहे.

Pune Jain Boarding: पुणे जैन बोर्डिंग हाऊस विक्रीविरोधात धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय

 

Web Title: Raigad news the historic journey of building shivsrushti begins bhoomi pujan ceremony held at mhasala by mp sunil tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • Raigad News
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Karjat News : ऐन दिवाळी बळीराजाच्या घरात दिवाळं; वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान
1

Karjat News : ऐन दिवाळी बळीराजाच्या घरात दिवाळं; वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान

Raigad News: फेक नरेटिव्ह तयार करणारे विरोधक सावध रहा – हसन मुश्रीफ
2

Raigad News: फेक नरेटिव्ह तयार करणारे विरोधक सावध रहा – हसन मुश्रीफ

Raigad News :  दिवाळीत प्रशासनाचं निघतंय दिवाळं ; खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बोनससाठी आंदोलन
3

Raigad News : दिवाळीत प्रशासनाचं निघतंय दिवाळं ; खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बोनससाठी आंदोलन

Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’
4

Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.