पुणे जैन बोर्डिंग हाऊस विक्रीविरोधात धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय
Pune Jain Boarding: पुण्यातील शिवाजीनगर येथील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागा विक्री प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.जैन बोर्डिंग हाऊसच्या जागा विक्रीविरोधात झालेल्या आंदोलनावनंतर धर्मादाय आयुक्तांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जैन समाजाच्या भावना लक्षात घेता धर्मादाय आयुक्तांनी या प्रकऱणात “जशास तशी स्थिती राहणार’ अस आदेश दिला आहे.
आज मुंबईत धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांच्या समोर एचएनडी जैन बोर्डिंग संदर्भातील अती तातडीची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी भक्कम आणि कायदेशीर बाजू मांडली. सुनावणीसाठी जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन आणि इतर जैन बांधव उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर १९५८ साली या जागेवर हिराचंद नेमचंद दोषी यांनी वसतिगृहाची उभारणी कऱण्यात आली होती. त्यावेळी त्यावेळी य जागेचे विकासकाम विश्वस्तांच्या देखरेखीखाली करण्यात येणार होते. पण समाातील काही लोकांनी याला विरोध केला. पण काही दिवसांपूर्वी या जागेची परस्पर विक्री केल्याचा आरोपही झाला, ज्यामुळे जनआंदोलन उभे राहिले.
धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयापूर्वी मुंबईत एचएनडी जैन बोर्डिंग संदर्भातील अती तातडीची सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी भक्कम कायदेशीर बाजू मांडली. सुनावणीसाठी जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन आणि इतर जैन बांधव उपस्थित होते. या प्रकरणात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरही काही आरोप करण्यात आले होते, तसेच पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी व्यवहाराला मंजुरी देताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही समोर आला.
यासंदर्भात बोलताना अॅड. योगे पांडे म्हणाले की, “भगवान महादेव दिगंबर मंदिरावर संकट आले आहे. या विक्रीत मंदिराचे नाव नसले तरी, ती जागा मंदिराशी संबंधित आहे. आम्ही धर्मादाय आयुक्तालयात तातडीने सुनावणी होण्याची मागणी केली होती. आजच्या सुनावणीत मंदिराचे चित्र, फोटो आणि इतर पुरावे सादर केले. तसेच धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करून त्यांच्याकडून आदेश मिळवले असल्याचे देखील स्पष्ट केले. या महिन्यात 28 तारखेला सुनावणी ठरवण्यात आली आहे. त्या वेळी मंदिर अस्तित्वात आहे की नाही यावर रिपोर्ट तयार करायचा आहे,” असे ॲड. योगेश पांडे यांनी सांगितले.
योगेश पांडे म्हणाले, “त्यांनी आदेश दिला आहे की त्या ठिकाणी मंदिर आहे की नाही, ते जाऊन पाहावे. आयुक्ताची दिशाभूल केली गेली आहे. ट्रस्टकडे पैसे नाहीत, इमारत मोडकळील आल्याचे सांगण्यात आले. ट्रस्टने जो आदेश दिला होता. त्याविरोधात आम्ही युक्तिवाद मांडला. त्यांच्या आधीच्या सुनावणीत कुठेही मंदिराचा उल्लेख नाही.
मंदिरात मुरलीधर मोहोळ येऊन गेले असल्याचे फोटो आणि संबंधित डॉक्युमेंट्स आहेत. अर्ज विक्री व्यवहार आधीचा होता, मात्र नवीन घटनाक्रम देखील आम्ही मांडणार आहोत. त्या जागेवर मंदिर आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले तर मंदिर दिसते; सर्वांनी कागदोपत्री मंदिर गायब केले आहे,” असे ॲड. योगेश पांडे यांनी सांगितले.