Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

40 लाखांच्या कथित मागणीचा व्हिडिओ व्हायरल; आमदार राजेश क्षीरसागर वादात, आमदारपुत्रांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

राजेश क्षीरसागर यांच्या कथित 40 लाखांच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले आहे. आमदारपुत्रांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून विरोधकांनी या प्रकरणात SIT चौकशीची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 08:57 PM
40 लाखांच्या कथित मागणीचा व्हिडिओ व्हायरल; आमदार राजेश क्षीरसागर वादात, आमदारपुत्रांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

40 लाखांच्या कथित मागणीचा व्हिडिओ व्हायरल; आमदार राजेश क्षीरसागर वादात, आमदारपुत्रांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • आमदार राजेश क्षीरसागर यांचा 40 लाखांच्या कथित मागणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • आमदारपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी व्हिडिओ व्हायरल करण्यामागे काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला.
  • विरोधकांनी SIT चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली असून सरकारवर दबाव वाढला आहे.
 

राजेश क्षीरसागर यांचा 40 लाख रुपयांच्या कथित मागणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यापाऱ्यासोबत पैशांच्या कथित व्यवहाराबाबत चर्चा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर करत रविकिरण इंगवले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

आमदारपुत्रांचा सतेज पाटलांवर आरोप

राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी या प्रकरणामागे सतेज पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या काळातही हाच व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. तसेच, रविकिरण इंगवले यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप करत त्यांना “ब्लॅकमेलर” असल्याचा दावा केला.

चौकशीची मागणी; विरोधक आक्रमक

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची सत्यता तपासून तातडीने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली.

मोठी बातमी! ‘फडणवीस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ नयेत म्हणून…’; उद्धव ठाकरेंचा विमानातील भेटीनंतर मोठा राजकीय दावा

याचवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी केली आहे.

वर्षा गायकवाड यांची ‘झिरो टोलरन्स’ची मागणी

वर्षा गायकवाड यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओची गांभीर्याने दखल घ्यावी आणि चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. महायुतीच्या नेत्यांशी संबंधित अशा आरोपांवर सरकारने ‘झिरो टोलरन्स’ धोरण स्वीकारावे, असेही त्यांनी म्हटले.

नेमकं काय घडलं होतं ?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी एका व्यावसायिकाकडून तब्बल 40 लाख रुपयांची कथित मागणी करण्यात आल्याचा दावा केला.

इंगवले यांनी या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेला पैशांच्या कथित देवाण-घेवाणीचा संभाषणाचा व्हिडिओ पत्रकारांसमोर सादर केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘विमानापेक्षा इमान महत्त्वाचं’; उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर एकनाथ शिंदेंचा टोला

पत्रकार परिषदेदरम्यान इंगवले यांनी संबंधित व्हिडिओ दाखवत, त्यामध्ये एका व्यावसायिकासोबत पैशांच्या व्यवहाराबाबत चर्चा होत असल्याचा दावा केला. या व्हिडिओची सत्यता तपासून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. दरम्यान, या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आरोपांबाबत त्यांची बाजू अद्याप स्पष्ट झालेली नसून, या प्रकरणात पुढे काय घडते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rajesh kshirsagar 40 lakh video viral satej patil allegations sit demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Rajesh Kshirsagar
  • Satej Patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.