Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’

CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाला आता राकेश टिकैत यांच्या भारतीय किसान युनियनचा पाठिंबा मिळाला आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 07, 2026 | 10:05 PM
CJP Protest farmers support

CJP Protest farmers support

Follow Us
Follow Us:
  • 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर CJPकडून आंदोलनाची घोषणा.
  • राकेश टिकैत यांच्या भारतीय किसान युनियनचा आंदोलनाला पाठिंबा.
  • शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने दिल्लीत यावं, असं आवाहन
 

CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता आणखी जोर धरताना दिसत आहे. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.

या आंदोलनाला आता शेतकरी संघटनांचाही पाठिंबा मिळाला आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

राकेश टिकैत आंदोलनात उतरणार; शेतकरी संघटनेचा पाठिंबा

भारतीय किसान युनियनचे यूपी युवा प्रदेशाध्यक्ष अनुज सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओ जारी करून संघटनेच्या सहभागाची माहिती दिली.

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

अनुज सिंह यांनी 10 ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याचं आवाहन केलं आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करू नये, असं सांगतानाच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘मतदानाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न’; शेतकरी संघटनेचा आरोप

अनुज सिंह यांनी व्हिडीओ संदेशातून मतदानाच्या अधिकाराचा मुद्दाही उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला दिलेला ‘एक मत’ हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ज्ञानेश कुमार हे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपचे लाडके असल्याचा आरोप करत, देशात हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

‘हे केवळ एका पक्षाचं आंदोलन नाही’

हे केवळ एका राजकीय पक्षाचं आंदोलन नसून सामान्य नागरिकांचं आंदोलन असल्याचा दावा अनुज सिंह यांनी केला. त्यामुळे देशभरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी 10 ऑक्टोबरला पूर्ण ताकदीने जंतर-मंतरवर जमा व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

शेतकरी संघटनेने आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर CJPकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राकेश टिकैत आणि भारतीय किसान युनियनने आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल CJPने त्यांचे आभार मानले आहेत.

‘शेतकरी आणि सामान्य जनतेची एकजूट मजबूत होईल’

शेतकरी आणि सामान्य जनता एकत्र आल्याने लोकशाही वाचवण्याचा लढा आणखी मजबूत होईल, असा दावा CJPने केला आहे.

दरम्यान, 10 ऑक्टोबरच्या जंतर-मंतर आंदोलनात राकेश टिकैत यांच्या सहभागामुळे आंदोलनाला किती मोठं स्वरूप मिळतं, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते, हेही महत्त्वाचं ठरणार आहे.

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Web Title: Rakesh tikait cjp protest gyanesh kumar resignation jantar mantar october 10 vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 10:05 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • rakesh tikait

संबंधित बातम्या

Jantar Mantar Protest : आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन? दिल्ली पोलिसांच्या ACP वरच गंभीर आरोप; क्राईम ब्रांच करणार चौकशी
1

Jantar Mantar Protest : आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन? दिल्ली पोलिसांच्या ACP वरच गंभीर आरोप; क्राईम ब्रांच करणार चौकशी

Mumbai Protest: राज-उद्धव ठाकरे एकत्र; निवडणूक आयोगाविरोधात आझाद मैदानात आंदोलन
2

Mumbai Protest: राज-उद्धव ठाकरे एकत्र; निवडणूक आयोगाविरोधात आझाद मैदानात आंदोलन

CJP आंदोलनात लहान मुलांचा ‘मानवी ढाल’ म्हणून वापर? NHRC कडून मुंबई पोलीस, MeitY अन् X Corp ला नोटीस
3

CJP आंदोलनात लहान मुलांचा ‘मानवी ढाल’ म्हणून वापर? NHRC कडून मुंबई पोलीस, MeitY अन् X Corp ला नोटीस

Police Complaint Against Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंसह सहकाऱ्यांवर मुंबई पोलिसांत गु्न्हा दाखल
4

Police Complaint Against Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंसह सहकाऱ्यांवर मुंबई पोलिसांत गु्न्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.