Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवनराजे हत्याकांडात निर्दोष मुक्ततेनंतर राणाजगजितसिंह पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; ‘हे राजकीय कारस्थान होते’

Pavanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहनचालक समद काजी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 20, 2026 | 04:36 PM
पवनराजे हत्याकांडात निर्दोष मुक्ततेनंतर राणाजगजितसिंह पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; 'हे राजकीय कारस्थान होते'

पवनराजे हत्याकांडात निर्दोष मुक्ततेनंतर राणाजगजितसिंह पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; 'हे राजकीय कारस्थान होते'

Follow Us
Follow Us:
  • ’20 वर्षे आरोपांचे सावट सहन केले’
  • ‘हे राजकीय कारस्थान होते’
  • पवनराजे प्रकरणाच्या निकालावर राणाजगजितसिंह पाटील यांचे वक्तव्य
Ranajagjitsinha Patil on Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर व त्यांचे वाहनचालक समद काजी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करत या प्रकरणामागे राजकीय कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला. ते हत्याकांड दुर्दैवी असल्याचे सांगत न्यायालयाच्या निकालामुळे गेल्या दोन दशकांपासून डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांवर असलेल्या आरोपांच्या सावटाला पूर्णविराम मिळाल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निकालानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आ. राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. यावेळी त्यांचे पुत्र मल्हार पाटील व मेघ पाटील उपस्थित होते.

‘शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,’ कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय

राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर हे प्रकरण समोर आले. नव्वदच्या दशकात ते मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार होते आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना त्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले होते. त्यानंतर २००९ मध्ये खासदार असताना त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याच काळात पवनराजे निंबाळकर व समद काजी हत्या प्रकरणात त्यांना गोवण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

या प्रकरणामुळे पाटील कुटुंबाला गेली वीस वर्षे मोठा मानसिक, सामाजिक आणि राजकीय त्रास सहन करावा लागला. न्यायालयीन लढाईमुळे सार्वजनिक जीवनावरही त्याचा परिणाम झाला. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्य यामुळे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रियता कमी झाली असून, या संपूर्ण प्रकरणाने त्यांना मोठा मनस्ताप दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना राणाजगजितसिंह पाटील यांनी हा न्याय सत्याचा विजय असल्याचे सांगितले. संकटकाळात खंबीरपणे साथ देणारे कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतक यांचे त्यांनी आभार मानले. तसेच कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादामुळे आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासामुळे अखेर न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालानंतर या बहुचर्चित प्रकरणावरील राजकीय आणि सामाजिक चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, पाटील कुटुंबाकडून या निकालाला न्यायाचा विजय म्हणून संबोधले जात आहे.

‘निवडून तुम्ही दिलं, जाब विचारण्याचा अधिकार तुमचाच’, फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना थेट आवाहन

Web Title: Ranajagjitsinh patil reaction after acquittal in pavanraje nimbalkar and samad kazi murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Mumbai
  • Pavanraje Nimbalkar
  • Ranajagjitsinha Patil

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
4

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.