Ravindra Dhangekar will leave the Congress and enter the Shiv Sena Shinde group
पुणे : पुण्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. धंगेकर हे सध्या कॉंग्रेसमध्ये आहेत. मात्र लवकरच ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे रवींद्र धंगेकर हे लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे पुण्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यात लवकरच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रवींद्र धंगेकर आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांनी भगव्या उपरणासह फोटो टाकल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. धंगेकरांच्या या स्टेटसची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एका वाहिनीशी संवाद साधताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या पक्षांतरबाबत मत मांडले आहे. धंगेकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी शिवजंयती होती. यानिमित्ताने मी सर्व शिवभक्तांसाठी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित होते. मी मला जे स्टेटस आवडतात ते स्टेटसला ठेवत असतो. एखाद्या सर्वसामान्याने केलेले फोटो किंवा रिलही मी स्टेटसला ठेवतो. माझा तो फोटो खूप चांगला आला होता. मला तो आवडला. त्यामुळे मी टाकला. प्रसारमाध्यमांनी त्यावर चर्चा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी जुने शिवजयंतीचे फोटो टाकायला लागले. यानंतर मग मी शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या. हा रिल टाकायचा माझ्या डोक्यातला विषय नाही. बऱ्याच दिवसांनी माझा चांगला फोटो आला त्यामुळे टाकला, असे मत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे कॉंग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याबाबत सूचक विधान केले आहे. धंगेकर म्हणाले की, “मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो. जाताना मी लपून जाणार नाही. मला आवडलं म्हणून मी फोटो टाकलो. मी शिवसेनेत चाललो अशी परिस्थिती निर्माण झाली. उदय सामंत माझे मित्र आहेत. अजितदादा यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आपला जन्म भगव्या उपरणातच झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. आपला मित्र आपल्यासोबत असावा, असे अनेकांना वाटतं. ऑफर देण्यात काहीही चूक नाही. मी आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करेल, असे सूचक विधान माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले आहे. यामुळे पुण्यामध्ये लवकरकच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.