Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election : “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार…”; शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केला विश्वास

शिवसेनेला कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्याची गरज नाही, असा विश्वास अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 05, 2026 | 02:56 PM
Local Body Election : “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार…”; शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केला विश्वास
Follow Us
Close
Follow Us:
  • “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार
  • शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केला विश्वास
अलिबाग : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी अलिबागमध्येच नाही तर संपुर्ण जिल्ह्यात चांगले काम केले आहे. आंबेपुर मतदार संघात सातत्यपुर्ण कामांमुळे येथे शिवसेनेचे मताधिक्य दिवसेंदिवस वाढत आहे. हा मतदार संघ राजाभाई केणी यांचा गड असून या मतदार संघात त्यांच्या पत्नी रसिका केणी यांचा निर्विवाद विजय होईल. त्याचबरोबर या मतदार संघाबरोबरच महाड, पोलादपुरमध्ये मंत्री भरतशेट गोगावले, कर्जत खालापूरमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या मोर्चेबांधणीतून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यात कोणीही अडचण येणार नाही. त्यामुळे शिवसेनेला कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्याची गरज नाही, असा विश्वास अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढील काही दिवसातच जाहीर होणार असून त्यापुर्वीच अलिबाग विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडून शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. थळ मतदार संघात मानसी दळवी, मापगाव मतदार संघात दिलीप भोईर यांच्यानंतर आंबेपुर मतदार संघाची शिवसेनेच्या उमेदवार म्हणून रसिका केणी यांच्या प्रचाराचा नारळ आमदार महेंद्र दळवी यांनी फोडला आहे. रविवारी आंबेपुर मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत रसिका केणी यांना विजयी करण्यासाठी येथील कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. पांडवादेवी येथे आयोजित आढावा बैठकीला हजारोंच्या संख्येने परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कामगार नेते दीपक रानवडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर, महिला संघटीका संजिवनी नाईक यांचीही भाषणे झाली.

Mayor of Mumbai : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा

 

विकासकामांच्या जोरावर निश्चित विजय मिळणार- रसिका केणी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून प्रचाराला वेग आला असून, आंबेपूर मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रसिका केणी यांनी आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व मतदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी विकासकामे, लोकांचा विश्वास आणि पुढील वाटचाल यावर भर दिला. रसिका केणी म्हणाल्या की, आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. याच विकासाच्या पायावर जनतेचा विश्वास असून, “राजाभाईच्या रूपाने मला जिंकून द्या,” अशी भावना मतदार व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचारादरम्यान मतदारसंघातील विविध भागांत फिरताना आलेले अनुभव सांगताना रसिका केणी म्हणाल्या, गोरगरीब, सामान्य नागरिक माझ्यावर प्रेमाने कौतुकाची थाप मारत आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि विश्वास हेच माझे खरे भांडवल आहे. त्यांच्या आशीर्वादानेच मी निश्चितपणे जिंकून येईन, असा मला पूर्ण विश्वास आहे. महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असा ठाम शब्द दिला. बचत गटांच्या माध्यमातून घरघंट्यांचे वाटप पारदर्शक व न्याय्य पद्धतीने केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडून आल्यानंतर कोणतेही राजकीय हेवेदावे न बाळगता सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार असून, पक्षभेद विसरून विकासालाच प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

राजकारणाच्या पद्धतीवर भाष्य करताना रसिका केणी म्हणाल्या, आधी काम करायचं आणि नंतर नारळ फोडायचा, हा राजाभाई केणी यांचा ठरलेला आणि विश्वासार्ह पॅटर्न आहे. मात्र याआधी काही ठिकाणी कामे मंजूर करून प्रत्यक्षात ती पूर्ण न करताच खोटी बिले काढण्याचे प्रकार झाले. अशा खोटारड्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या लोकांना मतदान करण्यापासून दूर ठेवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

जे सख्या मामाचे, भावाचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे कसे होणार- राजाभाई केणी

दरम्यान, याच सभेत शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आंबेपूर मतदारसंघ हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला मानला जात होता;.परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विरोधकांवर टीका करताना त्यांनी, जे सख्या मामाचे किंवा भावाचे होऊ शकले नाहीत, ते जनतेचे काय होणार? असा सवाल उपस्थित केला. भाजपमध्ये प्रवेश करून आता आंबेपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या काही नेत्यांवर टीका करताना राजाभाई केणी म्हणाले की, या नेत्यांनी येथील विविध औद्योगिक कंपन्यांना विरोध केला. त्यामुळे या परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी उद्योगविरोधी भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या अशा नेत्यांना आता जनता योग्य जागा दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकूणच, विकासकामे, जनतेचा विश्वास आणि संघटनेची ताकद यांच्या जोरावर शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा दावा करत या सभेने आगामी निवडणुकांसाठी राजकीय वातावरण अधिक तापवले आहे.

“फडणवीसांचं त्यांच्या पक्षातसुद्धा त्यांचं कोणी ऐकत नाही…! खासदार संजय राऊतांचा महायुतीवर संताप

 

Web Title: Shiv sena does not need an alliance mla mahendra dalvi expressed confidence that saffron will prevail in raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
1

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील
2

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे
3

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे

Mumbai Crime News: दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
4

Mumbai Crime News: दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.