Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Politics: महागठबंधनमध्ये बिघाड झाल्याची चर्चा अन् इकडे RJD ने थेट…; राघोपूरमध्ये कोण जिंकणार?

बिहारमध्ये एनडीए विरुद्ध महागठबंधनमध्ये ही निवडणूक होणार आहे. दरम्यान एनडीएच्या जवळपास सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर महागठबंधनमधील आरजेडी पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2025 | 02:25 PM
Bihar Politics: महागठबंधनमध्ये बिघाड झाल्याची चर्चा अन् इकडे RJD ने थेट…; राघोपूरमध्ये कोण जिंकणार?
Follow Us
Close
Follow Us:

बिहार विधानसभेसाठी 2 टप्प्यात होणार मतदान 
आरजेडी पक्षाने जाहीर केली उमेदवारांची यादी 
महागठबंधनमध्ये जागावाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता 

RJD Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एनडीए विरुद्ध महागठबंधनमध्ये ही निवडणूक होणार आहे. दरम्यान एनडीएच्या जवळपास सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर महागठबंधनमधील आरजेडी पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

आरजेडी पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आरजेडी पक्षाने आपल्या 143 उमेदवारांची घोषणा केली आहे. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आरजेडी हा एकमवे पक्ष आहे जो सर्वाधिक जागा या निवडणुकीत लढवणार आहे. दरम्यान आरजेडीचे तेजस्वी यादव हे वैशाली जिल्ह्यातील राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना भाजपच्या सतीश कुमार यादव यांच्याशी होणार आहे.

कॉँग्रेसने देखील जाहीर केली उमेदवारांची यादी

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. कॉँग्रेसने आपल्या 6 उमेदवारांची घोषणा केली आहे. कॉँग्रेस बिहारमध्ये एकूण 60 जागा लढवत आहे. काही जागा तर अशा आहेत की जिथे कॉँग्रेस विरुद्ध आरजेडी असा मुकाबला पाहायला मिळणार आहे.

बिहार विधानसभा चुनाव-2025 के लिए राष्ट्रीय जनता दल द्वारा चयनित प्रत्याशियों की सूची। सभी उम्मीदवारों को हार्दिक बधाई एवं विजय की अग्रिम शुभकामनाएं। #Bihar #RJD pic.twitter.com/QI7ckgoIQ6 — Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) October 20, 2025

‘एनडीए’ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस?

बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. जागावाटप पूर्ण झालेले नाही. मित्रपक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. सर्वात मोठी राजद व कॉँग्रेस यांच्यात वाद सुरू आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधातच अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.

Bihar Politics: ‘एनडीए’ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस? पक्ष एकत्र मात्र… ; विषय काय?

एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केल्याने, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. नक्की कोणासाठी प्रचार करायचा हे कार्यकर्त्यांना समजत नाहीये. यामुळे महागठबंधनमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वैशाली विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे संजीव कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन दिवसांमध्येच राजदचे अभय कुशावाह यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजीव कुमार यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने आता या जागेवर तोडगा कसा निघणार हे पहावे लागणार आहे.

महागठबंधनमध्ये अनेक विषयांववरून वाद सुरू आहेत. जागावाटप हे केवळ एकच मुद्दा आहे.  दरम्यान बिहारची निवडणूक जवळ आली आहे. निवडणूक जवळ आली तरी अजून जागावाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महागठबंधन असे नाव दिसून येत असले तरी आतून अजूनही मने एकत्रित झाली नसल्याची स्थिती दिसून  येत आहे.

Web Title: Rjd party share 143 candidate list tejashwi yadav raghopur for bihar elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Bihar Elections 2025
  • RJD
  • Tejashwi Yadav

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.