Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजपाची डेडलाईन जवळ आली’; प्रशांत किशोरांच्या विजयावर रोहित पवारांचा हल्लाबोल

बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले. भाजपच्या पराभवावर भाष्य करत त्यांनी 'भाजपाची डेडलाईन जवळ आली' असा दावा केला आणि डिलिमिटेशन विधेयकावरही भाष्य केले.

  • By विवेक
Updated On: Aug 03, 2026 | 09:07 PM
'भाजपाची डेडलाईन जवळ आली'; प्रशांत किशोरांच्या विजयावर रोहित पवारांचा हल्लाबोल

'भाजपाची डेडलाईन जवळ आली'; प्रशांत किशोरांच्या विजयावर रोहित पवारांचा हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • रोहित पवारांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रशांत किशोर यांचे केले अभिनंदन
  • भाजपवर टीका करत ‘डेडलाईन जवळ आली’ असा दावा
  • डिलिमिटेशन विधेयकाबाबतही व्यक्त केला राजकीय अंदाज
 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या विजयाचे स्वागत करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. फेसबुकवर केलेल्या सविस्तर पोस्टमध्ये त्यांनी प्रशांत किशोर यांचे अभिनंदन करताना भाजपच्या राजकीय भवितव्यावरही भाष्य केले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात मतदारांनी प्रशांत किशोर यांना विजयी करून भाजपला मोठा धक्का दिला आहे. प्रत्येक राजकीय पक्षासाठी एक वेळ निश्चित असते आणि या निकालाने भाजपाची ती वेळ आता जवळ आल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा त्यांनी केला.

Bankipur byelection Result: बांकीपूरमध्ये जनसुराजचा झेंडा; प्रशांत किशोरांच्या विजयाने बिहारच्या राजकारणाची समीकरणे बदलणार?

नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?

प्रशांत किशोर यांचे अभिनंदन करताना रोहित पवार यांनी, “भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना विजयी करुन भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक ‘डेडलाईन’ असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे. भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन! आता पूर्वीसारखं ‘अपना टाईम आएगा’ असं नाही तर ‘अपना टाईम आ गया..’ त्यामुळं थोडा धीर धरा…. विजय आपलाच आहे..!” असा संदेशही त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना विजयी करुन भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक ‘डेडलाईन’ असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे.… pic.twitter.com/8Dbl9OR0oG — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2026


याच पोस्टमध्ये त्यांनी डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाबाबतही राजकीय अंदाज व्यक्त केला. दिल्लीतील जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाचा उल्लेख करत आणि बांकीपूरमधील भाजपच्या पराभवाचा संदर्भ देत त्यांनी संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, असे झाल्यास तो लोकशाहीचा विजय ठरेल. ते म्हणाले,”आता मला वाटतंय डिलिमिटेशन बिल काही पास होणार नाही. दिल्लीत जंतरमंतरवर झालेलं तरुणाईचं आंदोलन आणि बांकीपूरमध्ये झालेला दारूण पराभव बघितला तर संसदेत डिलीमिटेशन बील मंजूर होणार नाही असंच दिसतंय… आणि निश्चितच हा लोकशाहीचा विजय असेल!”

प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

दरम्यान, बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा 18,953 मतांनी पराभव केला. अंतिम निकालानुसार, प्रशांत किशोर यांना 63,203 मते, तर भाजपचे नीरज कुमार यांना 44,250 मते मिळाली. राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा गुप्ता या 14,085 मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिल्या.

‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

गेल्या तीन दशकांपासून बांकीपूर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील निकालाला केवळ एका मतदारसंघाचा निकाल म्हणून नव्हे, तर बिहारच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा महत्त्वाचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. अशा पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या फेसबुक पोस्टनेही राजकीय चर्चांना नवे परिमाण मिळाले असून, त्यांच्या विधानांवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून पुढे काय प्रतिक्रिया येतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: Rohit pawar on prashant kishor bankipur victory bjp deadline facebook post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Jan Suraaj party
  • Prashant Kishore
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar News: आदित्य ठाकरेंना क्लीनचीटच मिळेल; सीबीआयच्या FRIनंतर रोहित पवारांचा घणाघात!
1

Rohit Pawar News: आदित्य ठाकरेंना क्लीनचीटच मिळेल; सीबीआयच्या FRIनंतर रोहित पवारांचा घणाघात!

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी
2

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.