Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; विरोधकांच्या मागणीला जोर

पोलिसांनी खरातच्या घरातून आणि डिजिटल उपकरणांतून ५८ अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. यात अनेक प्रभावशाली महिला आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2026 | 09:46 AM
Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; विरोधकांच्या मागणीला जोर
Follow Us
Follow Us:

नाशिक : भोंदूगिरीच्या आड महिलांचे शोषण करणाऱ्या नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिष ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या अटकेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खरातकडून जप्त केलेल्या ५८ आक्षेपार्ह व्हिडिओंमुळे अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आणि प्रतिष्ठित 5 व्यक्तींचे धाबे दणाणले असून, याप्रकरणावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार ‘कलगीतुरा’ रंगला आहे. दरम्यान, याप्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

पोलिसांनी खरातच्या घरातून आणि डिजिटल उपकरणांतून ५८ अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. यात अनेक प्रभावशाली महिला आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कृष्णा चांदगुडे यांनी राजकीय दबावाला बळी न पडता सखोल तपास करा, अशी मागणी केली आहे. या व्हिडिओंमधील व्यक्तींची नावे समोर आल्यास राज्यातील अनेक बड्या घराण्यांना धक्का बसू शकतो.

रूपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’मध्ये विश्वस्त असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सुषमा अंधारे यांनी विचारले आहे की, महिलांच्या शोषणाचा मुद्दा जुना असताना चाकणकर अनभिज्ञ कशा? जबाबदार पदाचा गैरवापर करून खरातला मदत केली गेली का?

सोशल मीडियावर ‘डिजिटल वॉर’

एक्स आणि फेसबुकवर या प्रकरणावरून दोषारोप होत आहेत. खरातचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल केले जात असून, श्रद्धेच्या नावाखाली हा हैदोस कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता? असा प्रश्न विचारत आहेत. खरातने मर्चेंट नेव्हीतील निवृत्ती आणि अंकशास्त्राचा वापर करून राजकीय नेत्यांमध्ये जागा बनवली होती. आता पोलीस तपासात या ‘भोंदू’ जाळ्याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हा केवळ गुन्हा नाहीतर…

हा केवळ गुन्हा नसून हाय-प्रोफाईल शोषण रॅकेट आहे. खरातला राजकीय संरक्षण कोणी दिले आणि त्या व्हिडिओंमध्ये अजून कोण आहे? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अशोक खरात याचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल केले जात आहेत. श्रद्धेच्या नावाखाली हा प्रकार सुरु होता. खरात हा मर्चेंट नेव्हीत नोकरीला होता. मात्र, त्याने निवृत्ती घेतली. अंकशास्त्राचा वापर करून राजकीय नेत्यांमध्ये जागा बनवली होती. आता पोलीस तपासात या ‘भोंदू’ जाळ्याचे धागेदोरे अनेक ठिकाणी पसरले आहेत.

हेदेखील वाचा : Nashik Crime : नाशिकमध्ये संतापजनक घटना ! मुलानेच वडिलांवर चाकूने हल्ला; दीड महिन्यानंतर मृत्यू, आरोपी अटकेत

Web Title: Rupali chakankar must resign immediately opposition demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • maharashtra news
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा
1

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.