Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sahyadri Sugar Factory Election : ‘सह्याद्रि’त सत्ताधाऱ्यांची विजयाकडे वाटचाल…; समर्थकांचा जल्लोष, विरोधकांचा हिरमोड

Sahyadri Cooperative Sugar Election 2025 : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत झाल्याने उत्साह शिगेला पोहचला होता. मतदान देखील विक्रमी टक्क्यांनी झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2025 | 06:04 PM
Sahyadri Cooperative Sugar Election 2025 Ruling party moves towards victory opposition faces challenges

Sahyadri Cooperative Sugar Election 2025 Ruling party moves towards victory opposition faces challenges

Follow Us
Close
Follow Us:

कराड : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनलने तब्बल चार हजारांची आघाडी घेतली. यामध्ये विरोधी आमदार मनोज घोरपडे व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे पॅनल दुसऱ्या, तर निवासराव थोरात, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर असल्याने पी. डी. पाटील पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून आले. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी ११.४५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मतपत्रिकांची विभागणी केल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक आणि सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या आदेशाने मतमोजणी सुरुवात करण्यात आली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

  • गट क्रमांक 1 : कराड – पहिल्या फेरीमध्ये टेबल क्रमांक 1 ते 50 मतदान केंद्र क्रमांक 1 ते 50 यामध्ये उमेदवार निहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे, अण्णासो पाटील 8114, शामराव पाटील 7854, संजय चव्हाण 3848, राजेंद्र माने 3786, संदीप पाटील 910 एवढी मोठी मिळाली. वैध मते 24512 ठरली.
  • गट क्रमांक 2 : तळबीड – पहिल्या फेरीमध्ये टेबल क्रमांक 1 ते 50 मतदान केंद्र क्रमांक 1 ते 50 यामध्ये उमेदवार निहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे, राजेंद्र जाधव 856, बाळासाहेब माने 3933, सुरेश माने 7910, बाबुराव पवार 893, भास्कर पवार 3733, संभाजी साळवे 7529, वैध मतांची बेरीज 24854 होती.
  •  गट क्रमांक 3 : उंब्रज – पहिल्या फेरीमध्ये टेबल क्रमांक 1 ते 50 मतदान केंद्र क्रमांक 1 ते 50 यामध्ये उमेदवार निहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे, सिद्धार्थ भोसले 3904, जयसिंग चव्हाण 893, संजय गोरे 7934, अजित जाधव 834, जयंत जाधव 7673, संपतराव जाधव 3788, युवराज खांबे 862, विजय निकम 7651, सुरेश पाटील 3737,
    वैध मतांची बेरीज 37276 होती.
  • गट क्रमांक 4 : कोपर्डे हवेली – पहिल्या फेरीमध्ये टेबल क्रमांक 1 ते 50 मतदान केंद्र क्रमांक 1 ते 50 यामध्ये उमेदवार निहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे,v आबासो चव्हाण 12, भरत चव्हाण 923, नेताजी चव्हाण 8063, सुभाष चव्हाण 3788, श्रीकांत जाधव 18, सुनील जगदाळे 7734, राजन पाटील 3663, राजेंद्र पाटील 7786, सुरेंद्र पवार 15, भिकू पिसाळ 3676, दिनकर पिसाळ 800, वैध मतांची बेरीज 36478 होती.
  • गट क्रमांक 5 : मसूर – राजेंद्र चव्हाण 7919, उमाजी चव्हाण 36, प्रमोद गायकवाड 903, संतोष घाडगे 7694, अरविंद जाधव 7456, उदय जगदाळे 838, वसंतराव जगदाळे 3913, श्रीकांत कदम 3707, सुहास कदम 800, विश्वासराव माने 11, अशोकराव साळुंखे 3521 अशी मते मिळाली. तर 4.30 नंतर वाठार किरोली गटाच्या मतमोजणी सुरू होती.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत झाल्याने या निवडणुकीसाठी सुमारे 81 टक्के इतके विक्रमी मतदान झाले. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्क्याचा कोणाला फायदा होणार? याबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्याचा निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने सरासरी 4000 मतांची आघाडी घेतल्यामुळे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला.

सायंकाळी 5.30 वाजण्याचा सुमारास दुसऱ्या फेरीतील मतमोजणीस प्रारंभ करण्यात येणार होता. दरम्यान, अंतिम निकाल रात्री उशिरा हाती येण्याची शक्यता होती. एकंदरीत पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलच्या उमेदवारांची सरासरी 4000 हजारांची आघाडी कायम राहिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण मतदान प्रक्रियेत सर्व 99 मतदान केंद्रांवर अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. परंतु, या निवडणुकीत कमालीची टशन दिसून आल्याने मतमोजणी व निकालावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Sahyadri cooperative sugar election 2025 ruling party moves towards victory opposition faces challenges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 06:04 PM

Topics:  

  • Karad news
  • Satara News

संबंधित बातम्या

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय
1

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
2

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
3

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण
4

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.