आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
नाशिक : देशभरामध्ये रामनवमी उत्सवाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात राजकीय नेत्यांची मांदियाळी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील काळाराम मंदिराचे दर्शन घेतले आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून राजकीय टिप्पणी केली आहे. खासदार राऊत यांनी भाजपवर त्यांच्या स्थापना दिवसावरुन निशाणा साधला आहे. तसेच वक्फ बोर्ड विधेयकावरुन देखील निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भाजप पक्षाची स्थापना आमच्या समोर झाली आहे. मूळ शिवसेना हीच भाजपाला सिनियर आहे. तेव्हा एका उदात्त हेतूने यांचा जन्म झाला. मात्र ज्यांनी जन्म घातला ते (लालकृष्ण अडवाणी सारखे) नेते तुरुंगात आहेत.आताची भाजप मूळ भाजप नाही,” असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर स्थापनादिनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार संजय राऊत यांनी वक्फ बोर्डच्या विधेयकांच्या मंजूरीवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “कुठलेही मुद्दे हिंदुत्वासोबत जोडून भाजप वातावरण खराब करत आहे. हिंदूंना मूर्ख समजता का तुम्ही? वक्फ बोर्डाची जमिनी तुम्हाला हडप करायची आहे. मोठ्या उद्योगपतींना या जमिनी देण्यासाठी हे सुरू आहे. सार्वजनिक जमिनी उद्योगपतींना विकून झालेत, त्यामुळे आता वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली. भविष्यात या जमिनी भाजप नेते आणि उद्योगपतींच्या घशात घालणार. मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावर टीका करतात. 2025 पर्यंत च्या मशीद आणि मद्रास यांना हात लावणार नाही पण रिक्त जमिनी विकून गरीब मुस्लिमांना पैसे देणार असं अमित शहा म्हणाले आहेत,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर संजय राऊतांनी पुन्हा एकदा घणाघात केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता शिवसेना फोडून मोदींच्या पायापाशी ठेवणे. युज ॲड थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे त्यांचे नाव कसे काढणार? बापाचा ब काढणार का? असा सवाल खासदार राऊत यांनी विचारला आहे. पुढे ते म्हणाले की, कोण दीपक केसरकर ते मोदींशी भेट घडवणार का? केसरकर केव्हा हिंदुत्ववादी झाले, उद्धव ठाकरेंना मोदी सोबत भेट घेण्यासाठी केसरकर का लागतील? पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी केसरकर आम्हाला लागत असतील तर आम्हाला राजकारण सोडावे लागेल,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.