Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील जेन झेडसोबतच्या संवादावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पुण्यातील जेन झेड कार्यक्रमाला ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याची आठवण करून देत राऊतांनी फडणवीसांना सवाल केला.

  • By विवेक
Updated On: Aug 23, 2026 | 04:23 PM
Sanjay Raut

Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील कार्यक्रमाला ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याची आठवण करून राऊतांनी नागपूरमधील कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केला.
  • ‘कॉकरोच जनता पार्टी’चा उल्लेख करत राऊतांनी भाजपच्या राजकारणावर जोरदार निशाणा साधला.
  • शाळांमधील निकृष्ट पोषण आहार आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या शिक्षिकेच्या निलंबनाचा मुद्दा राऊतांनी उपस्थित केला.
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात Gen Z सोबत संवाद साधणार असताना या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांसह भाजपवर जोरदार टीका केली आहे. पुण्यात झालेल्या Gen Z च्या कार्यक्रमाला ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याचा संदर्भ देत राऊतांनी नागपुरातील कार्यक्रमावर थेट सवाल उपस्थित केला.

Gen Z च्या प्रश्नांकडे आता सरकारचे लक्ष गेले आहे, यामागे तरुण कार्यकर्त्यांच्या आंदोलनांचा आणि त्यांच्या मांडणीचा प्रभाव असल्याचा दावा राऊतांनी केला. त्यांनी काही तरुण कार्यकर्त्यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमावर उपरोधिक टिप्पणी केली.

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’

संजय राऊत यांनी यावेळी थेट सवाल करत भाजपवर निशाणा साधला. ‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’ असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांना आणि तरुणांना ‘पेड इव्हेंट’ म्हणून हिणवणे योग्य नसल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. याचवेळी राऊतांनी लाडकी बहीण योजना आणि बिहारमधील आर्थिक मदतीचा संदर्भ देत भाजपच्या राजकारणावर टीका केली. भाजप स्वतःच ‘पेड इव्हेंट’ असल्याची बोचरी टिप्पणी त्यांनी केली.

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित

दरम्यान, राऊतांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा मुद्दाही उपस्थित केला. आंबेगावमधील एका शाळेत देण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई झाल्याचा दावा त्यांनी केला. कच्चे धान्य आणि वाटाणा शिजत नसल्याचा आरोप करत संबंधित पुरवठादारांवर कारवाई का होत नाही, असा सवाल राऊतांनी केला.

शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवाज उठवला असताना तिच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत राऊतांनी सरकारला लक्ष्य केले. तसेच संबंधित अन्नधान्य पुरवठादारांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

एकीकडे Gen Z च्या प्रश्नांवर संवाद साधण्याचा सरकारचा प्रयत्न आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांवरील आरोप यामुळे शिक्षण आणि तरुणांच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

Web Title: Sanjay raut attack devendra fadnavis gen z event nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadnavis
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा
1

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा

भाजपच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद, ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर पोहोचला; काँग्रेसचा दावा
2

भाजपच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद, ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर पोहोचला; काँग्रेसचा दावा

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
3

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देण्याचा दावा
4

पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देण्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.