Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : “हा देश वेड्यांचा देश म्हणून यादीमध्ये येईल…; संजय राऊतांचे आश्चर्यकारक विधान

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा आणि राज ठाकरे यांच्या पाडव्या मेळाव्यातील भाषणाचा खरपूस समाचार घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2025 | 10:54 AM
mp sanjay raut target cm devendra fadnavis and raj thackeray meet political news

mp sanjay raut target cm devendra fadnavis and raj thackeray meet political news

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौरा करुन संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे कौतुक करुन संघाच्या सेवा कार्याचे मनभरुन कौतुक केले. तसेच संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुणाल कामरा अशा मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तर आमचा राज ठाकरेंना पाठिंबा

खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणत्या कामांची अपेक्षा आहे असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. पुढे राऊत म्हणाले की, “राज ठाकरे यांची लोकसभेची भूमिका पूर्णपणे वेगळी होती. ती भाजपच्या सोयीची होती, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे. मराठी भाषेसाठी जर तर कानखाली आवाज काढणार असतील तर जरुर काढला पाहिजे. मराठी माणसांचं संघटन भारतीय जनता पक्षाने उद्धस्त केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी कानखाली मारायचं ठरवलं असेल तर नक्की आम्ही सोबत आहोत. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका कोणी घेऊ नये,” असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जगामध्ये वेड्यांचा देशांच्या यादीमध्ये…

संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या या वक्तव्याच्या खासदार राऊतांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “हा शोध त्यांनी कुठून लावला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान काय याबद्दल त्यांनी एकदा ब्रिफिंग घेतलं पाहिजे. बेड्या तोडल्या म्हणजे नेमकं केलं काय? लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचे जोपर्यंत बंद होत नाही तो पर्यंत या देशाच्या लोकांची मानसिकता सुधारणार नाही. तुम्ही लोकांना अंधभक्त करत आहेत. भ्रमिष्ठ आणि वेडे करत आहेत. हा देश एकदिवस जगामध्ये वेड्यांचा देश आणि खोटारड्यांचा देश म्हणून यादीमध्ये येईल,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

कुणाल कामराला धमकी देणारा मंत्रिमंडळात

संजय राऊत यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्या पोलिसांकडे हजर होण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कुणाल कामरा याला ठार मारण्याची धमकी देणारा व्यक्ती हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. असा माणूस मंत्रिमंडळामध्ये कसा असू शकतो. दुसरा कोणी असता तर पोलिसांनी त्याला उचलला असता. मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोक्का लावला असता. टायरमध्ये घालून मारेल आणि जिवंत कसा राहतो अशी वक्तव्य मंत्रिमंडळातील लोकांनी कुणाल कामराबाबत केली आहेत. पण, गृहमंत्री हे बधिर आणि मूक अवस्थेमध्ये हे सगळं सहन करत आहेत,” असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

 

 

Web Title: Sanjay raut live press target pm narendra modi and raj thackeray political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • PM Narendra Modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते
1

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

Ayodhya Ram Mandir: “अशोक सिंघल यांना…”; सरसंघचालक मोहन भागवत नेमके काय म्हणाले?
2

Ayodhya Ram Mandir: “अशोक सिंघल यांना…”; सरसंघचालक मोहन भागवत नेमके काय म्हणाले?

Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारतमध्ये मोठा बदल! लाखो कुटुंबांना आता 5 लाख नाहीतर 10 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार
3

Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारतमध्ये मोठा बदल! लाखो कुटुंबांना आता 5 लाख नाहीतर 10 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी सनातनच्या शिखरावर आज फडकवणार भगवा ध्वज; हजारोंची असणार उपस्थिती
4

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी सनातनच्या शिखरावर आज फडकवणार भगवा ध्वज; हजारोंची असणार उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.