Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

राहुल गांधी पुण्यात ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमात सहभागी होत असताना बारामतीत संजय राऊत रामरक्षा आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला.

  • By विवेक
Updated On: Aug 22, 2026 | 07:08 PM
Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Follow Us
Follow Us:
  • मोरगावमध्ये संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनाला भाजपकडून विरोध.
  • भाषणात राऊतांनी भाजपवर जोरदार टीका करत शिवसैनिकांना आक्रमक आवाहन केल्याचा दावा.
  • आंदोलनादरम्यान एका महिलेने गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
 

काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमात सहभागी होत असताना बारामती तालुक्यातील मोरगावमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले. ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रामरक्षा आंदोलनात खासदार संजय राऊत सहभागी झाले होते.

या आंदोलनाला भाजपकडून विरोध करण्यात आला. त्यातून भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये वाद झाल्याचे समोर आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल

आंदोलनादरम्यान भाषण करताना संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. राम मंदिरासाठी कारसेवकांनी बलिदान दिले, मात्र मंदिरात चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप

मंदिर परिसरात CCTV व्यवस्था असतानाही कथित चोरी कशी झाली, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. रामाच्या नावावर सत्ता मिळवून त्याच रामाच्या मंदिरात चोरी होत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.

‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची’

संजय राऊत यांच्या भाषणातील एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. “भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची,” असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांना जाब विचारण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राऊत यांनी शिंदे यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली. रामाच्या रक्षणाचा अधिकार ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनाच असल्याचेही त्यांनी भाषणात म्हटले.

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

रामरक्षा आंदोलनात महिलेचा गोंधळ

दरम्यान, मोरगावमधील या आंदोलनात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित ग्रामपंचायत सदस्य स्वाती शेरे गायकवाड यांनी गोंधळ घातल्याची माहिती आहे. संजय राऊत यांना प्रश्न विचारायचे असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनस्थळी स्थानिक ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले.

बारामतीतील या आंदोलनामुळे ठाकरे गट आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राऊत यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Sanjay raut ramraksha andolan baramati bjp shivsena clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • BJP
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
2

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
3

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
4

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.