mp sanjay raut target cm devendra fadnavis and raj thackeray meet political news
मुंबई : वक्फ बोर्ड विधेयक हे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झाले आहे. राज्यसभा व लोकसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील स्वाक्षरी केली आहे. मात्र याला विरोधकांकडून कोर्टामध्ये आव्हान दिले गेले आहे. या विधेयकावरुन राज्यामध्ये देखील राजकारण तापले आहे. शिवसेना टाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी वक्फ बोर्ड विधेयकावरुन जोरदार निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशासह आंतरराष्ट्रीय राजकारणावर देखील भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “या विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीतील काही लोक कोर्टात गेले आहेत. उद्या हे लोक बोधगयावर दावा करतील. भाजपचे लोक चैत्यभूमीवर जातील हे तिथेही दावा सांगतील. संसेदत आम्ही या बिलाविरोधात आम्ही मतदान केले आहे. कारण हे विधेयक जमिनीसाठी आणले आहे. या जमिनी आपल्या उद्योगपतींना टॉवर बांधण्यासाठी देतील,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “शेअर बाजार कोसळत असताना मोदी विदेशात फिरत आहे. त्यांचे अंध भक्त कौतूक करत आहे. वक्फ बोर्डाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. परंतु त्यात आज मुस्लमांची संपत्ती गेली. उद्या ख्रिश्चिन लोकांची संपत्ती जाईल. त्यानंतर बौद्ध, जैन लोकांची संपत्ती जाईल. देवस्थांनांच्या जमीनीवर यांचा डोळा आहे, असे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी म्हटले आहे, ते सत्य आहे,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा आग्रह धरताना सर्व आस्थापने, बॅंका आणि कार्यालय येथे मराठी भाषेचा वापर होत आहे का हे बघायला लावले. यामुळे राज्यभरामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यामुळे राज ठाकरे यांनी पत्र काढून आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले. यावर प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले की, ‘तुम्हालाही माहीत आहे. आम्हालाही माहीत आहे. त्यात काय चालतेय,” अशी एका वाक्यात संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेतील नागरिक रस्त्यावर उतरले आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जस दिसल तसं आता अमेरिकेत दिसत आहे. अमेरिकेच्या जनतेच्या त्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. अमेरिकेच्या 50 राज्याची जनता ही ट्रम्प आणि उद्योगपती मस्क म्हणजे तिकडले अडाणी यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचा स्फोट होण्याची शक्यता आहे आणि ते होणार हा देश विकला जात आहे तसा हा देश मोदी आणि अमित शहा यांना विकला जात आहे ही वक्फ बोर्ड त्याची एक महत्त्वाची पायरी आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “या देशात सुद्धा गावागावांमध्ये रस्त्यावर उतरून क्रांतीचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही. उद्योगपती तुमचा लाडका असल्यामुळे तोच हस्तक्षेप करू शकतो. या देशात चार उद्योगपती आहेत ते देश चालवत आहेत. हस्तक्षेप करत आहेत त्यांच्या सोयीने धोरण बदलली जात आहेत. कामगार कायदे बदलले जात आहेत. हे त्यांच्यासाठी आहे. उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकावलं तरी आश्चर्य वाटणार नाही. या देशात सुद्धा तेच घडणार. म्हणून मी वारंवार बोलत आहे नरेंद्र मोदी 2025 चा काळ पूर्ण करतील का मला शंका वाटते,” अशी गंभीर टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.