Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?

अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील अप्रत्यक्षपणे कोपरखळी दिली. यावरुन स्वाभिमान असेल तर दोन्ही नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 28, 2025 | 12:49 PM
Sanjay Raut targets Amit Shah on ajit pawar eknath shinde as supporter

Sanjay Raut targets Amit Shah on ajit pawar eknath shinde as supporter

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Politics: मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. मात्र यामध्ये युतीमध्ये लढत द्यायची की स्वबळावर लढायचे याची चाचपणी अद्याप सुरु आहे. यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतंर्गत चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमित शाह हे मुंबईमध्ये भाडप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी आले होते. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाला राजकीय सूर जास्त होते. यामध्ये अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील अप्रत्यक्षपणे कोपरखळी दिली. यावरुन स्वाभिमान असेल तर दोन्ही नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. अमित शाह महाराष्ट्रामध्ये भाजप कोणत्याही कुबड्याशिवाय असल्याचे वक्तव्य केले. यांच्यावर केलेल्या टीकेचा देखील खरपूस समाचार खासदार राऊत यांनी घेतला. ते म्हणाले की, “हिंदुस्तानामध्ये अनेक ठिकाणी भाजप कुबड्यांवर सत्तेत आली. कुबड्यांच्या मदतीवर त्यांनी पक्ष वाढवला, आज बिहारमध्ये कुबड्या नाहीयेत का? महाराष्ट्रामध्ये दोन कुबड्या नाही का? कुबड्या घ्यायच्या वापरायच्या आणि फेकून द्यायच्या ही भाजपची नीती राहिली आहे,” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “भाजपला मराठी माणसांची शिवसेना फोडायची होती. त्यांचे काम झाल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही. महाराष्ट्रात भाजपला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. त्यांना कोण ओळखत नव्हतं. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले भाजपासाठी काम केले पाहिजे. बाबरी नंतर आम्ही देशभरात लोकसभा लढवणार होती. अटल यांनी विनंती केली तुम्ही निवडणुका लढवली तर भाजपची नुकसान होईल. आम्ही करताना करतो तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या, बाळासाहेब यांनी एका क्षणात मागे घेतले उमेदवार,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्तेमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह स्पष्ट बोले आहे. शिंदे आणि अजित पवार यांनी बाहेर पडावे. यांना स्वाभिमान असेल तर बाहेर पडावे. . एकनाथ शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर पडावं अमित शाह यांना दुर्बिण तयार करावी लागेल. राजकारणात चढ उतार होत असतात. अमित शाह म्हणजे सर्वेसर्वा नाही आहे. या देशात लोकशाही राहील. विरोधी पक्ष आहे म्हणून लोकांचा आवाज पोहोचतोय. इथे हे लोकशाही संपवायला निघाले आहे,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

भाजपमध्ये परिवारवाद नसल्याचे देखील अमित शाह मुंबईमध्ये म्हणाले. यावर संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह नंतर आले आहेत. व्यापार म्हणून ते आले. मुलाला क्रिकेटमध्ये टाकून राजकारण करायचे. कर्तृत्व शून्य मुलाला बसवायचे याला परिवारवाद म्हणतात,” असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.

Web Title: Sanjay raut targets amit shah on ajit pawar eknath shinde as supporter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Maharashtra Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”
1

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप
2

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप

Mumbai BJP Office: भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? भूमिपूजनाच्या दिवशीच रोहित पवारांनी व्यक्त केला संशय
3

Mumbai BJP Office: भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? भूमिपूजनाच्या दिवशीच रोहित पवारांनी व्यक्त केला संशय

Amit Shah Mumbai Visit: मुंबईमध्ये राजकीय खलबत वाढली! अमित शाह दौऱ्यावर, तर ठाकरेंची निर्धार सभा
4

Amit Shah Mumbai Visit: मुंबईमध्ये राजकीय खलबत वाढली! अमित शाह दौऱ्यावर, तर ठाकरेंची निर्धार सभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.