Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्र्यांनंतर आता अध्यक्षांबद्दल अटकळांना उधाण

Maharashtra Politics: अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे, मात्र पक्षाध्यक्षपदावरून संभ्रम कायम आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 01, 2026 | 06:02 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? (Photo Credit- X)

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष?
  • चर्चांना पूर्णविराम
  • सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीनंतर पक्षात सत्तासंघर्ष पेटला!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) घडामोडींचा वेग प्रचंड वाढला आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांचे पूर्णपणे खंडन केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, “माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये येत आहेत. मी स्पष्ट करू इच्छितो की, या बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही.” प्रफुल्ल पटेल यांच्या या खुलाशामुळे पक्षांतर्गत सुरू असलेल्या अध्यक्षपदाच्या रेसवर तात्पुरता पडदा पडला आहे.

I have noted few reports circulating in the media regarding my appointment as the National President of the Nationalist Congress Party. I wish to state with absolute clarity that these reports are totally baseless and lack any truth. ​The Nationalist Congress Party is a… — Praful Patel (@praful_patel) February 1, 2026

Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम

सुनेत्रा पवार यांची नियुक्ती आणि पक्षावर नियंत्रणाचा प्रयत्न

अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही घाईघाईने केलेली नियुक्ती म्हणजे पक्षावरील नियंत्रण राखण्याचा एक प्रयत्न आहे. पक्षात दोन गट पडले असून एका गटाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (सपा) विलीनीकरण नको आहे. संघटनेवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांना पुढे करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शरद पवारांचे सूचक मौन

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत शरद पवार यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी त्यांना सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता, त्यांनी “मला याबाबत काहीही माहिती नाही,” असे म्हणत मौन पाळले. पवारांच्या या भूमिकेमुळे काका-पुतण्यांच्या पक्षातील संबंध भविष्यात काय वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अस्थिकलश आणि विलीनीकरणाची चर्चा

पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिली की, अजित पवारांचा अस्थिकलश मुंबईत आणला असून तो प्रत्येक जिल्ह्यात नेला जाईल. विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले, “हा कुटुंबाचा निर्णय आहे आणि पवार कुटुंब जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.”

ZP Election 2026 : अजित दादांच्या निधनाच्या छायेतच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सुरुवात

Web Title: Who will be next ncp president after sunetra pawar deputy cm oath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • Maharshtra politics
  • Nationalist Congress Party
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!
1

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर
2

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप
3

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.