Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election 2026 : अजित दादांच्या निधनाच्या छायेतच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सुरुवात

महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 01, 2026 | 05:35 PM
अजित दादांच्या निधनाच्या छायेतच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सुरुवात

अजित दादांच्या निधनाच्या छायेतच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सुरुवात

Follow Us
Follow Us:

धाराशिव : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. डोंगराएवढ्या दुःखाच्या सावलीतच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला नाईलाजाने सुरुवात केली आहे. ढोल-ताशे, बँड, डॉल्बी, नाच-गाणे, फटाके व आतिषबाजी यांसारख्या भडक प्रकारांना फाटा देत अत्यंत मर्यादित आणि संयमित स्वरूपात प्रचार सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही काळ ठप्प झालेला महायुतीचा प्रचार हळूहळू पुन्हा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

निवडणुकांच्या निष्ठुर राजकारणामुळे दुःख व्यक्त करण्यासाठीचा अवकाशही हिरावून घेतला गेला आहे. प्रमुख नेत्याच्या अचानक निधनाचे दुःख मनात ठेवतच राष्ट्रवादी, भाजपा तसेच महाविकास आघाडीतील उमेदवार, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना प्रचाराच्या रणांगणात उतरावे लागत आहे.

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया

जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गटांपैकी केवळ धाराशिव तालुक्यातील बेंबळी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. या दुःखद पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र धुरगुडे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. भाजपाची प्रचार यंत्रणाही मर्यादित स्वरूपात असून वैयक्तिक गाठीभेटी हाच प्रचाराचा मुख्य मार्ग अवलंबला जात आहे.

भाजपाचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्याशी जवळचे नाते होते. त्यामुळे त्यांच्या निधनाचा परिणाम भाजपाच्या प्रचार यंत्रणेवरही स्पष्टपणे जाणवत असून महायुतीतील कार्यकर्ते अजूनही दुःखाच्या मानसिकतेत असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीने मात्र प्रचार सभा, कॉर्नर मीटिंग्स तसेच प्रचार वाहनांद्वारे ध्वनिक्षेपकातून गाण्यांच्या माध्यमातून प्रचाराला गती दिली आहे. जिल्ह्यातील गट व गण अक्षरशः पिंजून काढत महाविकास आघाडीने ठप्प झालेल्या महायुतीच्या प्रचाराच्या तुलनेत मोठी आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात भाजपा व राष्ट्रवादीच्या तुलनेत महाविकास आघाडीचा प्रचार अधिक जोमाने सुरू असल्याचे स्पष्ट होते.

७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे उर्वरित टप्पे पुन्हा वेळापत्रकबद्ध करण्यात आले आहेत. आता ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होईल. मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.

निवडणूक वेळापत्रकात काय शिल्लक आहे?

निवडणूक वेळापत्रकानुसार, नामांकन पत्रे दाखल करणे, अर्ज मागे घेणे, चिन्हांचे वाटप करणे आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील टप्प्यांमध्ये मतदान, मतमोजणी आणि राजपत्रात निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे समाविष्ट आहे.

Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

Web Title: The campaign for the zilla parishad panchayat samiti elections began in the shadow of ajit dada pawar demise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Maharashtra Politics
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.