• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Sanjay Raut Targets Prakash Ambedkar On The Issue Of Obc Reservation

प्रकाश आंबेडकर यांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत..; ठाकरे गटाने लगावला टोला

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या रुग्णालयामध्ये आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत प्रकृतीची माहिती देत ओबीसी आरक्षण घालवणार असल्याचा दावा केला आहे. यावरुन संजय राऊत आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 02, 2024 | 12:52 PM
sanjay raut target prakash ambedkar

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालावली होती. त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी करण्यात आली. यानंतर आता रुग्णालयामधून प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षण संपवणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर आता ठाकरे गटाने देखील प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “सगळ्यात आधी बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांची प्रकृती आराम पडावा त्यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे, काळजी आहे.ते या राज्याची नेते आहेत. त्यांचे वक्तव्य मला कोणीतरी सांगितलं, पण ते सत्त्यावर आधारित नाही. कोणत्या प्रकारचा आरक्षणाला कोणी हात लावणार नाही,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार…; ICU मधून प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा

पुढे संजय राऊत म्हणाले की, “आंबेडकर साहेबांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य ICU मधून करू नये. त्यांनी आधी स्वतःची प्रकृती सांभाळावी, ते ICU मध्ये आहेत, छातीवर ताण येईल अशी वक्तव्य त्यांनी ICU मधून  करू नये. ही खूप नाजूक शस्त्रक्रिया असते मी त्यातून दोन-तीन वेळा गेलोलो आहे. त्यांनी जास्त बोलू नये. पुढचे सात आठ दिवस त्यांनी खूप कमी बोललो पाहिजे असा वैद्यकीय सल्ला असतो. या प्रकरणांमध्ये त्यांनी आधी आपली प्रगती सांभाळावी महाराष्ट्र आम्ही सांभाळतो,”अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल केला आहे.

हे देखील वाचा : निवडणुकीपूर्वी शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात; हेलिकॉप्टर AB फॉर्मची आता चौकशी होणार, नेमकं प्रकरण काय?

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते आयसीयुमध्ये असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत की, “यंदाची ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा. दुसऱ्या बाजूला एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा,” असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Web Title: Sanjay raut targets prakash ambedkar on the issue of obc reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut Discharged: खासदार राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर; आज मिळणार डिस्चार्ज
1

Sanjay Raut Discharged: खासदार राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर; आज मिळणार डिस्चार्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन

Nov 13, 2025 | 08:51 AM
Team India A लढणार आज दक्षिण आफ्रिकेशी! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

Team India A लढणार आज दक्षिण आफ्रिकेशी! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

Nov 13, 2025 | 08:49 AM
Zodiac Sign: रुचक राजयोगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या सुख समृद्धीमध्ये होईल वाढ

Zodiac Sign: रुचक राजयोगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या सुख समृद्धीमध्ये होईल वाढ

Nov 13, 2025 | 08:41 AM
Pune Crime: पुणे हादरलं! मित्रांनीच व्यावसायिक मित्राला गोळीवबार करत संपवलं; कारण काय?

Pune Crime: पुणे हादरलं! मित्रांनीच व्यावसायिक मित्राला गोळीवबार करत संपवलं; कारण काय?

Nov 13, 2025 | 08:33 AM
फॅटी लिव्हरमुळे पोटात तीव्र वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबाचे सेवन, पैसे खर्च न करता मिळेल कायमचा आराम

फॅटी लिव्हरमुळे पोटात तीव्र वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबाचे सेवन, पैसे खर्च न करता मिळेल कायमचा आराम

Nov 13, 2025 | 08:32 AM
ताजमहालच्याही आधी बनला आहे ‘बेबी ताज’; खूप रंजक आहे याची कहाणी

ताजमहालच्याही आधी बनला आहे ‘बेबी ताज’; खूप रंजक आहे याची कहाणी

Nov 13, 2025 | 08:25 AM
मुलीच्या सासरच्यांकडून महिलेला बेदम मारहाण; फावड्याच्या लाकडी दांड्याने तर…

मुलीच्या सासरच्यांकडून महिलेला बेदम मारहाण; फावड्याच्या लाकडी दांड्याने तर…

Nov 13, 2025 | 08:23 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.