Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : दोघांच्या भांडणात तिसऱ्याची उडी! पवार कुटुंब एकत्र येण्यावरुन राऊत-राणे एकमेकांना भिडले

अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर उत्तर दिले.

  • By प्रीति माने
Updated On: May 30, 2025 | 04:26 PM
sanjay raut vs nilesh rane on ncp come together political news

sanjay raut vs nilesh rane on ncp come together political news

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकारण रंगले आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट अर्थात पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे राज-उद्धव यांच्यामधील दरी कमी होऊन ठाकरे कुटुंब देखील एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावरुन भाजप नेते व मंत्री नितेश राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक केल्यानंतर चर्चांना जोर आला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, याच्यात विरोधाभास कसा आहे बघा, आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत सांगतात, आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत हे सांगतात, एकत्र आले पाहिजे सांगतात, आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा एकत्र येत नाहीत, याचा अर्थ मोदींच्या मुख्य दुकानासोबत त्यांना आपले छोटे दुकान चालवायचे आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “प्रफुल पटेल महान नेते नाहीत, तटकरे आता अध्यक्ष आहेत, उद्या हा पक्ष विलीन होणार नाही अशी माझी माहिती आहे, पण झाला तर तटकरेंनी काय करायचे, केंद्रातील मंत्री पदांचा प्रश्न निर्माण होईल, प्रत्येक जण आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, असे देखील स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत व्यक्त केले. मात्र यावरुन भाजप नेते व मंत्री नितेश राणे आक्रमक झाले आहेत.  दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याची संजय राऊत यांची घाणेरडी सवय आहे,” असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नये यासाठी…

मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मंत्री नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याची संजय राऊत यांची घाणेरडी सवय आहे. दोन्ही ठाकरे एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेंचा एक गट प्रयत्नशील आहे, याची माहिती संजय राऊत का देत नाही? दोन्ही पवार एकत्र कधी यायचे ते ठरवतील. मात्र, दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नये यासाठी मातोश्रीचा कुठचा माळा काम करतोय याची थोडी माहिती संजय राऊत यांनी द्यावी,’ अशी टोलेबाजी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे मंत्री नितेश राणे म्हणाले की, “जयंत पाटील यांची जागा रोहित पवार यांना घ्यायची होती. त्यामुळे रोहित पवार यांचं हे षडयंत्र असू शकतं, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. पुढे ते म्हणाले की, “महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढायच्या की स्वबळावर लढायच्या? याचा निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतील त्यावर कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू, अशी भूमिका भाजप नेते नितेश राणे यांनी घेतली आहे. तसेच जी व्यक्ती अन्य वेळी देशभक्तीवर आपले चित्रपट काढून खिसे भरतात, मात्र पहलगाम हल्ला झाल्यानंतर साधं ट्विट पण कोणाला वाचायला मिळालं नाही. एवढा मोठा हल्ला पाकिस्तानने केला तेव्हा यांचं पाकिस्तानचं प्रेम उफाळून आलं असेल. यांना आपलं देशप्रेम दिसत नसेल तर यांना आपण त्यांचे चित्रपट बघून मोठे का करावे?” असा सवाल भाजप मंत्री नितेश राणे यांनी अभिनेता शाहरुख खान व अमीर खान यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Sanjay raut vs nilesh rane on ncp come together political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • ajit pawar
  • MP Sanjay Raut
  • Nitesh Rane
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
1

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे
2

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
3

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
4

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.