जयंत पाटलांबाबत युवा कार्यकर्त्यांची नाराजी; शरद पवार घेणार मोठा निर्णय
Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात नाराजीचा सूर वाढल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील अनेक युवा आमदार आणि कार्यकर्ते जयंत पाटील यांनी संघटनात्मक पातळीवर आपल्या जवळच्याच लोकांची पदांवर नियुक्ती केल्याच आरोप करत आहेत. त्यामुळे पक्षांर्गत नाराजी निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघटनात्मक फेरबदल करताना जयंत पाटील यांनी अनेक महत्त्वाची पदे त्यांच्या विश्वासू आणि निकटवर्तीयांनाच दिली. त्यामुळे पक्षातील इतर अनुभवी, कार्यक्षण आणि निष्ठावान लोकांना संधी मिळत नसल्याची नाराजी युवा आमदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हे सर्व नाराज आमदार थेट शरद पवार यांच्याकडेच आपल गाऱ्हाण मांडणामर असल्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. ही वाढती नाराजी लक्षात घेता शरद पवार यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार देखील उपस्थित होते. युवा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षातील गोंधळ शांत करण्यासाठी या बैठकीत अनेक विषय़ांवर चर्चा करण्यात आली.
St Bus : नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
दरम्यान, येत्या १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन असल्याने त्यापूर्वीच पक्षात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. यात काही नव्या नियुक्त्या आणि जबाबदाऱ्या बदलू शकतात, असेही बोलले जात आहे. त्यामुळे आता शरद पवार पक्षात कोणते बदल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील काही नेते या विलिनीकरणाला सकारात्मकदृष्ट्या पाहत असले, तरी दुसऱ्या एका गटाकडून त्याला तीव्र विरोध केला जात आहे.
Zodiac Sign: 31 मे रोजी या राशीच्या लोकांच्या जीवनात होतील मोठे बदल, संपतील आव्हाने
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे या विलिनीकरणास विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये समाविष्ट आहेत. विशेषतः प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात स्थान मिळण्याची चर्चा सुरू असतानाच, दोन्ही राष्ट्रवादी गटांचे एकत्र येणे हे त्यांच्या राजकीय गणितात अडथळा ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळेच ते विलिनीकरणास विरोध करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.