Sanjay Shirsat claim regarding ShivSena Balasaheb Thackeray dead body political news
Balasaheb Thackeray death Body : मुंबई : राज्यामध्ये आता शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरुन वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला असून यामध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गंभीर आरोप केला. रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस त्यांच्या बॉडीचा छळ केला असल्याचा गंभीर आरोप देखील रामदास कदम यांनी केला. शिंदे गटाच्या आणखी एका नेत्याने कदम यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण तापले आहे. या वादामध्ये आता शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी उडी घेतली असून त्यांनी या विधानाला दुजोरा दिला. संजय शिरसाट म्हणाले की, त्या काळात मी देखील मातोश्रीला होतो. विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी तिथे तयारी सुरू केली होती. त्यावेळच्या पोलीस कमिश्नर यांनी विचारलं काय झालं? आणि मग दिवाकर रावते आणि त्यांनी तिथे जाऊन ती सर्व तयारी डिमॉलिश केली, असा मोठा दावा विनायक राऊत यांनी केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं होतं, त्यानंतर विनायक राऊत यांनी रचलेलं सरण पुन्हा काढलं, ही झालेली गोष्ट आहे. म्हणून कदम यांनी चुकीचा आरोप केला असं मी. दरम्यान पुन्हा म्हणणार नाही, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी शिरसाट यांनी केला आहे यावर चर्चा करून मला बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला दुखावयला आवडणार नाही, त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही, असंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरुन सुरु असलेल्या राजकारणामध्ये संजय शिरसाट यांनी उडी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले रामदास कदम?
पत्रकार परिषद घेत रामदास कदम म्हणाले की,“मी हे स्पष्टपणे सांगतो की आणि हे मी जबाबदारीने सांगतो. दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे मी सांगतो. हे मी खूप जबाबदारीने सांगतो. होऊन जाऊ दे एकदा. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊ दे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर यावं आणि मी खोटं बोलतोय असं सांगावं. उद्धव ठाकरे हे कपटी आहेत. मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की त्यांचे हाताचे ठसे घेऊन ठेवले आहेत मी. हे संभाषण डायरेक्ट उद्धव ठाकरे आणि माझ्यामधील संवाद आहे. त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाल सांगा,”असा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.