Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे

Pune City Water Quota: शहराच्या पाणीपुरवठा योजनेसह एकूण पाणीवापराचा कोटा निश्चित करण्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयासाठी स्तरावर जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निश्चित करण्यात आलेल्या पाणी आवर्तनाच्या नियोजनाची अंमलबजावणी केली जाईल

  • By anuradha sagar
Updated On: Oct 30, 2026 | 03:11 PM
Pune News, Civic News, Water Crisis, Infrastructure, Public Utilities,

Pune News, Civic News, Water Crisis, Infrastructure, Public Utilities,

Follow Us
Follow Us:
  • पुण्याचा पाणीवाटपाचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
  • पुणे महानगरपालिकेची १८ टीएमसी पाण्याची मागणी
  • मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय
Pune City Water Quota: पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याचा कोटा निश्चित करण्यासह उपलब्ध पाण्याच्या एकूण वापरासंदर्भातील अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री घेणार आहेत. पुणे महानगरपालिकेने १८ टीएमसी पाण्याची मागणी केली असताना, ३० ऑगस्ट २०२७ पर्यंत १३ टीएमसी पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असून, या हंगामासाठी एकूण साडेचार टीएमसी पाणी उपलब्ध आहे. हे आवर्तन सुरू झाले आहे.

दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची अंमलबजावणी केल्यानंतर जानेवारीमध्ये कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग चारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे,   हेमंत रासने, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सीईओ गजानन पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, कृषी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde Mahayuti Rift: निकालानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस; एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय

शहराच्या पाणीपुरवठा योजनेसह एकूण पाणीवापराचा कोटा निश्चित करण्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयासाठी स्तरावर जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निश्चित करण्यात आलेल्या पाणी आवर्तनाच्या नियोजनाची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये पाणीसाठा आणि चापराच्या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात येईल, सर्वांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पाणीवाटपात अन्याय नको : विखे-पाटील

पाणी कपात, पाण्याचा अतिरिक्त वापर आणि उपलब्ध सातधाचा काटकसरीने विनियोग याबाबत जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पिपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही पाणी नियोजनाबाबत आवश्यक दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. पाणीवाटप करताना शहर, ग्रामीणसह कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही करावी असे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यानी दिले.

Torrent Project: ‘टोरंट प्रकल्प आम्हाला नको, राज्यात कुठेही न्या’; आरपीआय आठवले गटाचा विरोध

पुणे शहराच्या पाण्यात २० टक्के कपात करावी : पाटबंधारे विभाग

३१ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी २० टक्के पाणीकपात कराची, असे निर्देश पाटबंधारे विभागाने महानगरपालिकेला दिले होते. त्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यानी कालवा समितीची बैठक होईपर्यंत पाणीकपात करू नये, असे निर्देश दिले होते. पुणे शहराचा कमी करण्यात आलेला पाणीसाठा ११.३३ टीएमसीवरून पूर्ववत १६.१९ टीएमसी करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरासाठी १३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे महयपालिकेच्या मागणीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपातीचा मुद्य पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रब्बी हंगामासाठी साडेचार टीएमसी पाणी

रब्बी हंगामातील शेतीसाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, या हंगामासाठी एकूण साडेचार टीएमसी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन सुरू झाले असून, १५ नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि ग्रामीण भागातील शेतीसाठी आवश्यक पाणी यांचा समतोल साधून उपलब्ध साठ्याचा वापर करावा, यावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भर देण्यात आला. पुढील काळातील पाण्याची उपलब्धता आणि वापराचा आढावा घेऊन जानेवारीतील बैठकीत पुढील आवर्तनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे महापालिकेने शहरासाठी किती पाण्याची मागणी केली आहे?

    Ans: पुणे महानगरपालिकेने शहराच्या वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी १८ टीएमसी (TMC) पाण्याची मागणी कालवा सल्लागार समितीकडे केली आहे.

  • Que: पुण्याच्या पाण्याचा अंतिम निर्णय कोण घेणार आहे?

    Ans: पुणे शहराचा पाणी कोटा आणि आवर्तनाचे अंतिम नियोजन मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या विशेष बैठकीत निश्चित केले जाईल.

  • Que: रब्बी हंगामासाठी शेतीला किती पाणी सोडण्यात येणार आहे?

    Ans: रब्बी हंगामासाठी साडेचार (४.५) टीएमसी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले असून ते १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

Web Title: Pune city water quota pmc 18 tmc demand cm final decision as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Infrastructure
  • pune news
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!
1

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन
2

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक
3

प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक

‘बनपाव आणि त्याच्या आकाला जशास तसे उत्तर देणार’; युवा सेनेच्या जावळकरांचा इशारा
4

‘बनपाव आणि त्याच्या आकाला जशास तसे उत्तर देणार’; युवा सेनेच्या जावळकरांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.