Satara Politics: सातारा जिल्हा परिषदेत २० कोटींचा 'सेस फंड' घोटाळा?
दरम्यान या आंदोलनावेळी बोलताना संजय गाडे म्हणाले की, “सातारा जिल्हा परिषदेतील सेस फंड हा चुकीच्या पद्धतीने प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशणी नागराजन यांनी खर्च केला असून, अंगणवाडी इमारतीला नियोजन समितीतून प्रस्तावित निधी मंजूर झालेला असताना देखील जिल्हा परिषद सेसफंडातील लाखो रुपये हे अंगणवाडी इमारतींसाठी चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य वळवण्यात आले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर रिपब्लिकन पार्टीला संशय असून नेमके हे पैसे वळवण्याचा उद्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट करावा.
जवळपास 20 कोटींचा निधी गेल्या तीन वर्षांमध्ये वळवण्यात आला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वीस कोटींचा जिल्हा परिषदेला चूना लावला आहे. असा थेट आरोप गाडे यांनी केला तर चुकीच्या पद्धतीने केलेल्या खर्चाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी व दोषीवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी केली. आंदोलनावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला आघाडी अध्यक्ष रेखा सकट, गणेश भिसे,विशाल कांबळे,आशुतोष वाघमोडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.






