sharad pawar family not celebrated diwali 2025 at govindbug for bharati pawar death
No diwali Celebration in Pawar Family : बारामती : दिवाळीच्या सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरु असून बाजारपेठा सजल्या आहेत. फराळ, दिवे, आकाशंकदील लावणे सुरु असून चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय नेते देखील मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करत असतात. राज्यात पवार कुटुंबियांची दिवाळी ही नेहमी राजकीय चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत माहिती दिली आहे.
अनेक राजकीय नेते मंडळींकडेही दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पवार कुटुंबियांचा कौटुंबिक दिवाळी सोहळा गोंविदबाग येथे होत असतो. यानिमित्ताने जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येते. पवार कुटुंबामध्ये कितीही राजकीय भेद असले तरी दिवाळीला पवार कुटुंब एकत्र आनंदाने दिवाळी साजरी करत असल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी मात्र गोंविदबागेवर दिवाळी साजरी केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय आहे खासदार सुळेंची पोस्ट?
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही, कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे.
आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त… — Supriya Sule (@supriya_sule) October 16, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे मार्च महिन्यामध्ये निधन झालं आहे. भारती पवार यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे पवार कुटुंबात शोककळा पसरली. भारती पवार या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या जवळपास दीड वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भारती प्रतापराव पवार यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी दीर्घआजाराने निधन झाले. यामुळे यंदाच्या वर्षी पवार कुटुंबीय गोविंदबागेमध्ये दिवाळी साजरी न करण्याचे ठरवले आहे.