Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवार आले…पण ‘भाकरी फिरली’ नाही; साताऱ्यात शरद पवारांचा शांत दौरा

विशेष म्हणजे आजारपणातून सावरल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात दाखल झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2026 | 09:47 AM
पवार आले... पण ‘भाकरी फिरली’ नाही !

पवार आले... पण ‘भाकरी फिरली’ नाही !

Follow Us
Follow Us:

सातारा : साताऱ्याच्या राजकारणात शरद पवार यांचा दौरा म्हणजे नेहमीच राजकीय भूकंपाची चाहूल मानली जाते. “भाकरी फिरणार”, “मोठे बदल होणार”, “राजकीय संकेत मिळणार” अशा चर्चांनी जिल्ह्याचे वातावरण पेटून उठते. मात्र, यंदाचा दौरा पूर्णपणे वेगळा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान झाले आणि कोणतेही राजकीय संकेत न देता थेट मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ लावले जाऊ लागले आहेत.

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी 2026 ते 2029 या कालावधीसाठी त्यांची पुन्हा निवड झाली. या निवडीवेळी पवारांनी राजकारणाचा एकही धागा पकडला नाही. उलट रयतच्या भविष्यातील तंत्रज्ञानाधिष्ठित वाटचालीवर भर देत शिक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर भाष्य केले. त्यामुळे “पवारांच्या शांततेतही संदेश असतो” असे मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही दिसून आले.

दरम्यान, अजित पवार गट आणि शरद पवार गटातील संबंधांबाबत सातत्याने चर्चा सुरू असतानाही शरद पवार यांनी यावर पूर्ण मौन बाळगले. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही गटांमध्ये निर्माण झालेला भावनिक संवाद आणि संघर्षाऐवजी समांतर राजकीय प्रवासाची दिसणारी भूमिका यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता पवारांनी अत्यंत सूचक भूमिका घेतली. “एकीकरण” या चर्चेपासून त्यांनी जाणीवपूर्वक अंतर ठेवले, हे विशेष मानले जात आहे.

साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची संघटनात्मक उभारणी हा सध्या मोठा राजकीय विषय आहे. सत्ता नसताना संघटना जिवंत ठेवणे आणि नव्या पिढीला जोडणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पवारांचा सातारा दौरा कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता ही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शशिकांत शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या खांद्यावर स्पष्टपणे सोपवण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

विशेष म्हणजे आजारपणातून सावरल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात दाखल झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. तुतारीच्या गजरात, फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचे जोरदार स्वागत केले. सत्ता नसली तरी कार्यकर्त्यांच्या मनात पवारांविषयी असलेली निष्ठा आजही अबाधित असल्याचे यावेळी दिसून आले.

खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची उपस्थितीही यंदाच्या दौऱ्याचे विशेष आकर्षण ठरली. अधिकृत कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचा असला तरी राजकीय चर्चांचे केंद्र त्यांच्या भोवतीच फिरताना दिसले. सुप्रिया सुळे यांनी शेतकरी, महिला आणि वाढत्या अत्याचारांच्या प्रश्नावर सरकारला लक्ष्य केले, तर रोहित पवार यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

एकीकडे शरद पवारांची शांतता आणि दुसरीकडे पुढील पिढीची आक्रमक शैली या दोन भिन्न छटांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीचे बदलते चित्र स्पष्ट केले. देशाच्या राजकारणात मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारलेल्या शरद पवारांनी आता प्रत्यक्ष राजकीय संघर्षाची धुरा नव्या नेतृत्वाकडे सोपवण्यास सुरुवात केल्याचे संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत.

साताऱ्यात पवार आले, स्वागत झाले, गर्दी झाली… पण यावेळी कोणतीही “राजकीय भाकरी” फिरली नाही. मात्र, पवारांच्या शांततेतूनच नव्या राजकीय पर्वाची चाहूल कार्यकर्त्यांना मिळाली, एवढे मात्र नक्की.

“आमच्या गुरूला तू का बोललास…”, शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाही फेक; पिस्तूल दाखवत धमकावल्याचा गंभीर आरोप

Web Title: Sharad pawar quiet visit to satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
1

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य
2

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
3

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
4

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.