Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kailas Patil on Opreation Tiger: मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

Kailas Patil News: आमदार किंवा खासदार विरोधी पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता सर्व पक्षांची असते. मात्र लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचा आहे म्हणून संपूर्ण मतदारसंघाला विकासकामांपासून दूर ठेवणे ही लोकशाहीसाठी घातक प्रवृत्ती असल्याचे त्यांनी म्हटले.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 27, 2026 | 12:17 PM
Kailas Patil, Shivsena, Uddhav Thackeray, Operation Tiger, Maharashtra Politics

Kailas Patil, Shivsena, Uddhav Thackeray, Operation Tiger, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  •  कैलास पाटील यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचे स्पष्टीकरण
  • पक्षाशी आणि आपल्याला निवडून आणणाऱ्या शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणे हेच आपले कर्तव्य
  • उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील १४ हून अधिक आमदार लवकरच पक्ष बदलून एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत सहभागी होणार
Kailas Patil on Opreation Tiger: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी निष्ठावंत असल्याचे स्पष्ट केले. मला पक्ष सोडायचा असता तर २०२२ मध्ये सुरतच्या बॉर्डरवरून परत आलोच नसतो, असे ठाम विधान त्यांनी केले. कैलास पाटील म्हणाले की, आपण एका सामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलो असून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच दोन वेळा आमदार होण्याची संधी दिली.

लोकशाहीसाठी घातक प्रवृत्ती

त्यामुळे पक्षाशी आणि आपल्याला निवडून आणणाऱ्या शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. २०२२ मध्ये जो विचार होता, तोच आजही कायम आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विकासनिधीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 2.0’मुळे ठाकरे गटाला धक्का; आणखी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा

आमदार किंवा खासदार विरोधी पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता सर्व पक्षांची असते. मात्र लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचा आहे म्हणून संपूर्ण मतदारसंघाला विकासकामांपासून दूर ठेवणे ही लोकशाहीसाठी घातक प्रवृत्ती असल्याचे त्यांनी म्हटले. सत्ताधारी पक्षाने यंत्रणा आणि निधीच्या माध्यमातून विरोधी पक्षाला अडचणीत आणण्याचे धोरण स्वीकारल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

 

ठाकरेचे १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा

शिवसेनेचे (यूबीटी) सहा लोकसभा खासदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानंतर लगेचच, उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (26 जून 2026) एक धक्कादायक दावा केला आहे की, राज्यात ‘ऑपरेशन टायगर २.०’ सुरू झाले आहे. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील १४ हून अधिक आमदार लवकरच पक्ष बदलून एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे.

‘आयुष्याचा शेवट भारतातच व्हावा…’; वयाच्या 94 व्या वर्षी अमेरिकेतील आजींनी स्वीकारले भारतीय नागरिकत्त्व

गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “थोडी वाट पाहा, उद्धव गटातील १४ हून अधिक आमदार आमच्या पक्षात सहभागी होत आहेत.” पाटील यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा पावसाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील चार आमदारांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या एका गुप्त बैठकीची बातमी आधीच चर्चेत आहे.

 

 

 

Web Title: Maharashtra politics ubt mla kailas patil on operation tiger defection rumours uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • Kailas Patil
  • Maharashtra Politics
  • Operation Tiger
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.