Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena-NCP Politics: चंद्रकांत पाटलांनी डाव साधला…: शरद पवार गटाचा बडा नेता गळाला लावला

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे बरेचजण आमच्या सोबत येत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 09, 2025 | 04:42 PM
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; हा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; हा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

Jalgaon Politics: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे जिल्हाउपाध्यक्ष विनोद तराळ लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तराळ यांना गलाला लावल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील यंनीदेखील या पक्षप्रवेशाला दुजोरा दिला आहे.

विनोद तराळ यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शरद पवार यांच्यासह एकनाथ खडसे यांच्यासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. विनोद तराळ हे मुक्ताईनगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माफदा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष असून सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तराळ हे शरद पवार यांच्यासोबत राहिले, मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे जळगावच्या स्थानिक राजकारणातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbra Train Accident: “ठाकरे बंधू एकत्र येण्यापेक्षा…”; रेल्वे अपघातावर राज ठाकरेंचे भाष्य

विनोद तराळ यांच्यासोबत काही माजी व सध्याचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विकासोचे पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या पक्षांतरामुळे अंतुर्ली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या प्रभावाला मोठा धक्का बसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विशेषतः आमदार एकनाथराव खडसे यांना याचा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे आमदार चंद्रकांत पाटील यांची राजकीय स्थिती अधिक बळकट होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातूनच शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे विनोद तराळ शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरच्या राजकारणाला नव्याने कलाटणी मिळणार असून आगामी स्थानिक राजकारणावर या घडामोडींचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Russia-Ukraine War: युक्रेननंतर रशिया ‘या’ देशाला घेणार अंगावर; हल्ल्याच्या भीतीने घेतला मोठा निर्णय

यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे बरेचजण आमच्या सोबत येत आहेत. त्यात विनोद तराळ हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह लवकरच शिवसेनेत सहभागी होणार आहेत. यासाठी लवकरच मुहूर्त ठरवला जाईल,” अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. या घडामोडींमुळे मुक्ताईनगर व आसपासच्या भागातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता असून, शिंदे गट अधिक आक्रमक रणनीतीसह स्थानिक निवडणुकांत उतरू शकतो.

 

Web Title: Sharad pawars ncp district vice president to join eknath shindes shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 04:19 PM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.