रशिया जर्मनीवर आक्रमण करण्याची शक्यता (फोटो- सोशल मीडिया)
World War News: रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण असे युद्ध सुरु आहे. हे युद्ध अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. रशिया युक्रेनवर अत्यंत भीषण हल्ले करत आहे. युक्रेन देखिल रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहे. आता मात्र युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर रशियाचे लक्ष गेले आहे. युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर देखील रशिया भविष्यात मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्ध संपायचे नाव घेत नाहीये. त्यातच युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर रशिया येत्या काळात मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. आता युरोपीय देश देखील चिंतेत आले आहेत. जर्मनी देशाला आता रशिया हल्ला करेल अशी भीती वाटू लागली आहे. भविष्यात रशिया आपल्यावर हल्ला करेल अशी भीती जर्मनीला सतावत आहे. त्यामुळे बंकर आणि खंदक निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
काही रिपोर्टच्या माहितीनुसार, येत्या चार वर्षांमध्ये रशिया जर्मनीवर हल्ला करण्याची योजना आखू शकतो. जर्मनीवर कोणीही हल्ला करणार नाही असे पहिल्यांदा समजले जायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. युरोप खंडात मोठे युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रशिया-युक्रेन यांच्यात तीन वर्षांपासून युद्ध सुरु आहे. आता रशिया नाटो देशाना देखील आपल्या नागावर घेण्याची शक्यता आहे.
Russia Ukraine War: ‘शाहिद’ ठरतोय युक्रेनसाठी कर्दनकाळ! रशियाच्या भयानक हल्ल्याने जग देखील भेदरले
‘शाहिद’ ठरतोय युक्रेनसाठी कर्दनकाळ
प्रादेशिक गव्हर्नर व्याचेस्लाव चाउस यांनी दिलेल्या महितनुसार, गुरुवारी सकाळी रशियाच्या शाहिद ड्रोनने युक्रेनच्या प्रिलुकी भागात भीषण हल्ले केले. सहा शाहिद ड्रोनने युक्रेनवर हल्ला केला. ज्यामुळे अनेक रहिवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर क्षेत्रीय प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनियन शहर खार्किवमध्ये रशियाच्या हल्ल्यात 17 नागरिक जखमी झाले. ज्यामध्ये एका लहान मुलासह एका गरोदर महिलेचा आणि वृद्ध महिलेचा समावेश आहे.
युक्रेनचा विनाश अटळ!
जेव्हा युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर हल्ला केला तेव्हा पुतिनच त्याला प्रत्युत्तर देणार हे निश्चित झाले होते. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते त्याला प्रत्युत्तर देणार आहेत. ट्रम्प यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी सुमारे एक तास १५ मिनिटे फोनवर चर्चा केली. त्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु पुतिन सहमत होण्यास तयार नाहीत. त्यांनी स्पष्ट अल्टिमेटम दिला आहे की एअरबेसवरील हल्ल्याला दिले जाणारे प्रत्युत्तर इतके जोरदार असेल संपूर्ण जग ते पाहत राहील. पुतिन यांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितले की रशियामध्ये युक्रेनचे हल्ले आता असह्य आहेत. दोन्ही नेत्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावरही चर्चा केली, परंतु युक्रेनचा मुद्दा वर्चस्व गाजवत होता.