
shinde group mla gulabrao patil controversial statement on hema malini
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी देखील हेमा मालिनी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. रस्त्यांवरील खड्ड्यांचा उल्लेख करत त्यांनी हेमा मालिनी यांचे नाव घेतले होते. यावरुन जोरदार वाद निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मतदारांना आवाहन करताना त्यांचे नाव घेतले आहे. जळगावमध्ये मतदारांना मतदानाचे महत्त्व समजून सांगताना गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली.
हे देखील वाचा : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
जळगावमधील कार्यक्रमामध्ये मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही आता डॉक्टर बाबासाहेबांनी टाटा बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार दिला आहे.तोच अधिकार आपल्या सर्वांना दिला आहे. हेमा मालिनीला सुद्धा एक मत देण्याचा अधिकार दिला आहे.मंचावर उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुखांना उद्देशून मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असा समजा असं वादग्रस्त वक्तव्य पाटलांनी यावेळी केलं. राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही. राजा आता मतपेटीतून जन्माला येतो हा इतिहास डॉ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवल्याचे ते म्हणाले आहेत.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंचा देखील खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, कोण म्हणते देवाकडे वर भरावा लागतो आता खालीच भरावं लागतं. मुक्ताईनगर मध्ये निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची लढाई झाली. राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे भाजपचं काम त्या ठिकाणी केलं हा कोणता पिक्चर आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंचं नाव न घेता टीका केली.
हे देखील वाचा : ‘आमचे नगरसेवक चोरीला गेले ओ चोरीला…’; कल्याण-डोंबिवलीतील पोलिस स्थानकात तक्रार दाखल
खडसे माझ्यावर टीका करायचे गुलाबराव पाटील असा आहे आणि तसा आहे अरे बाबा मी निवडून आलो रे भो, मी असा तसा नाही आहे, तुम्ही आम्हाला त्रास दिला.खडसे यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं. आमदार चंद्रकांत पाटलांना त्रास दिला. जिल्ह्यात तुम्ही सर्वांना त्रास दिला म्हणून तुम्हाला हे आता भोगाव लागते आहे. माजी मंत्री सोबत बॅग पकडायला कोणी राहत नाही , असा खरपूस समाचार गुलाबराव पाटलांनी खडसेंचा घेतला.