Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Sena Bhavan: ठाकरे-शिंदे वाद नव्या वळणावर! दादरच्या ‘सेनाभवना’ला टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मोठा मास्टरप्लॅन

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाची संघटना विस्तारण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने नव्या कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेशही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्वतंत्र मुख्यालय असणे आवश्यक असल्याचे मत पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 23, 2026 | 05:10 PM
Shinde Sena, Sena Bhavan, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Mumbai Politics,

Shinde Sena, Sena Bhavan, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Mumbai Politics,

Follow Us
Follow Us:
  • शिंदे गटाकडून नव्या शिवसेना भवनाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू
  • मुंबईतील एका अत्यंत मोक्याच्या आणि मध्यवर्ती व्यावसायिक (Strategic Center) परिसराची निवड
  • हे नवे मुख्यालय केवळ पक्षाचे कार्यालय न राहता, त्यात अत्याधुनिक वॉर रूम, पत्रकार परिषद हॉल आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी सर्व सोयी-सुविधा असणारे भव्य ‘प्रति-सेनाभवन’
Eknath Shinde Politics: शिवसेना ठाकरे गटाच्या सात खासदारांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्काच मानला जात आहे. खासदारांच्या पक्षांतराला आठवडा उलटत नाही तोच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दुसरा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मुंबईत स्वतंत्र आणि भव्य ‘सेनाभवन’ उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार,शिंदे गटाच्या शिवसेनेचा राज्यभर झपाट्याने विस्तार होत असताना मुंबईत स्वतःचे मध्यवर्ती आणि सुसज्ज मुख्यालय असावे,अशी मागणी सातत्याने केली जात आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मागणीनंतर शिंदे गटाकडून नव्या सेनाभवनासाठी दोन संभाव्य जागांची पाहणी करण्यात आली. यामध्ये एक जागा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra Kurla Complex) परिसरात असून ती उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानापासून काही अंतरावर असल्याची चर्चा आहे. तर दुसरी जागा दादर परिसरातील असून उपमुख्यमंत्री शिंदेंनी या जागेला पसंती दिल्याचे बोलले जात आहे.

‘मराठीची चिरफाड केली’; राहुल नार्वेकरांवर राज ठाकरेंचा हल्लाबोल, विधानसभेतील शोकप्रस्तावावरून संताप

दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाची संघटना विस्तारण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने नव्या कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेशही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्वतंत्र मुख्यालय असणे आवश्यक असल्याचे मत पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक शिवसेना भवनाच्या धर्तीवर नव्या ‘सेनाभवना’ची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

मराठी अस्मिता आणि शिवसेनेच्या परंपरेशी दादरचा जवळचा संबंध असल्याने पक्षाचे मुख्यालयही दादरमध्येच असावे. त्यामुळे कॉर्पोरेट कार्यालयांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीकेसीपेक्षा दादरला अधिक प्राधान्य दिले जावे,असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे.

NEET UG Re-Exam 2026: कडक सुरक्षा की केवळ देखावा? हायटेक सुरक्षा भेदून बिहार ते हैदराबादपर्यंत कॉपी

दरम्यान, दादरमधील संभाव्य जागेबाबत काही तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. या अडचणी दूर झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत आधुनिक आणि प्रभावी मुख्यालय उभारून पक्षाचे संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करण्याचा शिंदेसेनेचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मात्र, नव्या सेनाभवनाबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्व अंतिम निर्णय कधी जाहीर करते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Web Title: Shinde sena new sena bhavan mumbai eknath shinde thackeray rivalry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai Politics
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
3

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
4

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.