Shiv Sena Shinde group leader Dada Bhuse gave a befitting reply to Uddhav Thackeray
धुळे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनांनी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मेळावे घेऊन एकमेकांवर निशाणा देखील साधला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे हिलाल माळी यांच्या आयोजित रक्तदान शिबिराला हजेरी लावली. यावेळी दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याच्या दिलेल्या नाऱ्यावर त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा टोला मंत्री दादा भुसे यांनी यावेळी लगावला आहे.
ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे आणि भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर ठाकरेंनी जोरदार प्रहार केला. मंत्री दादा भुसे यांनी धुळ्यातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्वबळावरच्या नाऱ्यावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्याबाबत आपण काय बोलणार? असे म्हणत टोला देखील लगावला. आमदारांची संख्या ही 20 वर आली आहे, तर खासदारांची संख्या ही 7 ते 8 वर आली आहे. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी टीका दादा भुसे यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याच्या राजकारणात नवा उदय होणार असल्याची चर्चा सध्या विरोधकांकडून सुरू असल्याच्या बाबत मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून सध्या काही जणांची अवस्था मुंगेरीलाल के हसीन सपने अशी झाली आहे अशी स्वप्न पाहण्यावर कुठलीही बंधनं नाहीत अशी टीका दादा भुसे यांनी यावेळी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे निर्णय घेणार आहेत त्यामुळे ते जो निर्णय घेतील त्यानुसार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील, असे स्पष्ट मत मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप व पालकमंत्रिपदावरुन नाराजीनाट्य सुरु आहे. काही जागांचा पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटला नसून पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे लवकरच निर्णय घेतील आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करू अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे. तर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. यावर दादा भुसे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पीटिशन दाखल असून समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे.