Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अधिकाऱ्यांना धमकवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात’; संजय राऊतांचा घणाघात

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील निवडणूकींच्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत. यावरुन आता महाविकास आघाडीचे नेते व खासदार संजय राऊत यांनी अमित शाह व भाजपवर निशाणा साधला आहे. नाशिकमध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 25, 2024 | 11:02 AM
sanjay raut target in amit shah

sanjay raut target in amit shah

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते व खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला असून माध्यमांशी संवाद साधला आहे. संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

विधानसभा निवडणूकीच्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहे. राज्यामध्ये प्रचाराचा धुराळा उडालेला असताना त्यांचे हे दौरे महायुतीसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले की, देशाच्या गृहमंत्र्यांना सर्व कामं टाकून मणिपूर, लडाख आणि उत्तर प्रदेश सोडून आणि देशाची कायदा व सुव्यवस्था सोडून आणि अतिरेक्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या निवडणूकीच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मणिपूरला किंवा काश्मीरच्या सीमेवर ते आढावा घ्यायला गेले नाहीत. लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं आहे, त्याचा आढावा नाही. अरुणाचलमध्ये 60 किमीमीटरमध्ये सैन्य घुसलं आहे पण गृहमंत्र्यांनी त्याचा आढावा घेतला नाही. देशाचं रक्षण सोडून महाराष्ट्रामध्ये येत आहेत ही गोष्ट मला गंमतीची वाटते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणाला किती जागा मिळणार?

पुढे संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री राज्याचा आढावा घ्यायला येतात, याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची खटीया खडी होती आहे, म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागलं. गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार तर आढावा बैठक हे फक्त सांगणार. पण इथले जे कलेक्टर आणि अधिकारी आहेत, त्यांना दम देणार. निवडणूकीमध्ये मतमोजणी करताना आमच्या बाजूने रहा असा दम हे अधिकाऱ्यांना देणार. केंद्रीय गृहमंत्री जेव्हा राज्याच्या निवडणूकांसाठी येतात, तेव्हा निवडणूक प्रक्रियेमधील अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी येतात. या गेल्या दहा वर्षांतील देशाचा अनुभव आहे. लोकसभेमध्ये सुद्धा काही मतदारसंघामध्ये हेच केलं. जेव्हा जेव्हा अमित शाह आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा तेव्हा राज्यातील एक एक उद्योग बाहेर जातो, अशी गंभीर शब्दांत संजय राऊत यांनी भाजप पक्षश्रेष्ठींवर टीका केली आहे.

Web Title: Shivsena mp sanjay raut target amit shah for maharashtra tour before vidhansabha elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 11:02 AM

Topics:  

  • BJP
  • sanjay raut
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
1

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’
2

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट
3

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.