Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर संजय राऊत यांनी हा खटला ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Aug 11, 2026 | 06:50 PM
Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Follow Us
Follow Us:
  • कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
  • संजय राऊत यांनी ‘न्याय मिळेल’ असा विश्वास व्यक्त केला.
  • पक्षांतर आणि पक्षफुटीच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो, असा दावा
 

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देताना घेतलेल्या निर्णयावर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले.

सुनावणी संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे गटाची भूमिका मांडली. या प्रकरणात न्याय मिळेल, असा विश्वास असल्याचे राऊत यांनी सांगितले.

‘निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप चुकीची’

संजय राऊत यांच्या मते, हे प्रकरण घटनापीठासमोर असल्याने संविधानातील विविध तरतुदी आणि त्यांचा अर्थ यावर सुनावणी होत आहे. शिवसेना प्रकरणात अनेक टप्प्यांवर संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा दावा त्यांनी केला. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची कायदेशीर बाजू न्यायालयासमोर मांडल्याचे राऊत यांनी सांगितले. हा युक्तिवाद भविष्यातील निर्णयांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटले.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा, सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

पक्षघटनेच्या मुद्द्यावरही भाष्य

शिवसेनेच्या पक्षघटनेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. २०१८ मध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे ठाकरे गटाने उल्लंघन केलेले नाही, तर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांकडूनच त्याचे उल्लंघन झाल्याचा दावा त्यांनी केला.

VIDEO | Delhi: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut, on the Supreme Court hearing on the dispute between the two factions of Shiv Sena, says, “There was a very detailed debate on the matter today. I believe the issues raised by Kapil Sibal will serve as a lesson for the country’s… pic.twitter.com/1rDlHR57hF — Press Trust of India (@PTI_News) August 11, 2026

पक्षफुटी आणि पक्षांतराच्या घटनांबाबत देशात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली.

‘चिन्ह दुसऱ्याला देण्याचा अधिकार आयोगाला नाही’

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दुसऱ्या गटाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे राऊत यांनी सांगितले. कपिल सिब्बल यांनी कायद्यातील संबंधित तरतुदींचा आधार घेत हा मुद्दा न्यायालयासमोर मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’

देशात झालेल्या विविध पक्षांतरांच्या घटनांचाही संदर्भ या प्रकरणाच्या माध्यमातून समोर आणण्यात आला असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे ठाकरे गटाला या सुनावणीतून आशेचा किरण दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

आता सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणात कोणता घटनात्मक आणि कायदेशीर निष्कर्ष काढते, याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. या निर्णयाचा केवळ शिवसेनेच्या पक्षनाव आणि चिन्हावरच नव्हे, तर भविष्यातील पक्षफुटी आणि पक्षांतराच्या प्रकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Shivsena party symbol case sanjay raut kapil sibal supreme court hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • sanjay raut
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
2

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
3

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
4

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.