Sushma Andhare demands resignation of Minister Dhananjay Munde
पुणे : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाला जवळपास एक महिना होत आला असला तरी देखील अद्यार सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर येत होते. 20 दिवस फरार राहिल्यानंतर वाल्मिक कराडने सरेंडर केले. यावरुन आता मंत्री धनंजय मुंडे यांना निशाण्यावर घेतले जात असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुषमा अंधारे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवदेन दिलं होतं आणि आरोपींना मोक्का लावणार असं सांगितलं होतं. मोक्का हा संघटित गुन्हेगारीविरोधातला कायदा आहे. संघटीत स्वरुपात काही घडलं आहे का? गुन्ह्यांची मालिका आहे का? तर राख आणि राखेशी संबंधित गोष्टी २०० रुपययांनी चालणारा हैवा आता ८ हजारांवर गेला आहे. पवन चक्क्यांचा अँगलही समोर आला आहे. २८१ पवन चक्क्या बीडमध्ये आल्या आहेत. त्यापैकी १३१ पाटोडा तालुक्यात आहेत. या पवन चक्क्यांना पोलिसांचं संरक्षण मिळतं पण शेतकऱ्यांना मिळत नाही.” असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “एका खुनाचा शोध लावला जाईल आणि गुन्हेगारी संपेल असं होणार नाही. सगळ्याच गोष्टींचा तपास झाला पाहिजे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. वाल्मिक कराड यांनी शरण येण्याचा घटनाक्रम स्क्रिप्टेड वाटला असाही आरोप अंधारे यांनी केला. आरोपी शरण येताना जर मीच आलो आहे हे सांगत असेल तर ही बाब पोलिसांचा नाकर्तेपणा दाखवणारी आहे,” असा घणाघात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे सुषमा अंधारे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, “सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की धनंजय मुंडेंची हितचिंतक म्हणून मला हे वाटतं की त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. एखाद्या प्रकरणावर इतके आरोप होणार असतील तर सुषमा अंधारेंनी राजीनामा दिला पाहिजे. कर नाही त्याला डर कशाला असं वाटत असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सगळं प्रकरण जेव्हा मिटेल तेव्हा पुन्हा मंत्रिपदावर यावं, असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. बसवराज तेली अधिकारी आहेत त्यांच्या पत्नीही अधिकारी आहेत. महत्त्वाच्या पदावर दोघंही अधिकारी आहेत. निलेश लंकेंच्या मतदारसंघात त्यांची फसवणूक झाली होती. आता त्यांनी ठामपणे प्रकरण धसास लागायचं आहे असं वाटत असेल तर शहाजी उमप यांच्यासारखे अधिकारी असले पाहिजेत. एक खुनाचा गुन्हा घडला आणि त्यातले गुन्हेगार पकडले गेले म्हणजे सगळं संपलं तर तसं ते नाही,” असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.