Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : उदय सामंत देणार एकनाथ शिंदेंना डच्चू? थेट होणार उपमुख्यमंत्री? महिला नेत्याच्या पत्राने खळबळ

एकनाथ शिंदे यांचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे बंडखोरीच्या तयारीमध्ये असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्र लिहित राजकीय भविष्यवाणी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 23, 2025 | 11:39 AM
shivsena Sushma Andhare letter to Uday Samant angers Eknath Shinde maharashtra politics

shivsena Sushma Andhare letter to Uday Samant angers Eknath Shinde maharashtra politics

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सुरु आहेत तर दुसरीकडे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीवारी करुन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे चर्चांना उधाण आले. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे बंडखोरीच्या तयारीमध्ये असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्र लिहित राजकीय भविष्यवाणी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत उदय सामंत यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे की, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले. पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले…!त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली…!!तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केले…!!शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केले…!!!!!! असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे त्यांनी लिहिले आहे की, उदयभाऊ , आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात. होय माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झाली. भेट घेतली नाही; भेट झाली..! दिल्ली महाराष्ट्र सदन च्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली माझ्या समवेत माझ्या पक्षाचे खा . भाऊसाहेब वाकचौरे असताना बाजूला खा. भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी भेट झाली, असे सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे.

प्रिय उदयभाऊ,
आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले.
….पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले…!त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली…!!तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक… pic.twitter.com/ldAK9ENMja
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 22, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

विशेष ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण तरीही मी समजूच शकते. उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात..! आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेला आहे. पण या निमित्ताने का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागलंय हे लक्षात आलं… असो.. हा फोटो मी काही सांगण्यापेक्षा जास्त बोलका आहे…! ताजकलम _ तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बरं का..!!!असा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.

Web Title: Shivsena sushma andhare letter to uday samant angers eknath shinde maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Uday Samant

संबंधित बातम्या

महायुतीत तणावाचे वातावरण; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला खुपली ‘ती’ गोष्ट
1

महायुतीत तणावाचे वातावरण; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला खुपली ‘ती’ गोष्ट

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?
2

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?

‘तुम्ही खणखणीत नाणं दिलं तर खणखणीत विकासकामे जोमाने करू’; अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन
3

‘तुम्ही खणखणीत नाणं दिलं तर खणखणीत विकासकामे जोमाने करू’; अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात
4

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.